महापालिका आयुक्तांची पंचवटीत पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:56 PM2019-03-19T22:56:22+5:302019-03-20T01:07:34+5:30
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी दुपारी पंचवटी विभागात पाणी दौरा करत पंचवटी मनपा कार्यालय रुग्णालय तसेच शाळांना भेटी देऊन या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पंचवटी विभागीय कार्यालयात कामकाजाची माहिती घेताना मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे.
पंचवटी : महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी दुपारी पंचवटी विभागात पाणी दौरा करत पंचवटी मनपा कार्यालय रुग्णालय तसेच शाळांना भेटी देऊन या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
आयुक्त गमे यांनी सुरुवातीला विभागीय कार्यालय, इंदिरा गांधी रुग्णालय याठिकाणी भेट देऊन तेथील सर्व विभागांतील कामकाजाची पाहणी केली. अधिकारी, कर्मचाºयांना दैनंदिन काम करताना येणाºया अडचणी जाणून घेत सूचना दिल्या. याशिवाय विभागात सुरू असलेल्या रस्ते, जलकुंभ, अग्निशमन दलाचे कार्यालयाचीदेखील पाहणी केली. दुपारी विभागीय कार्यालयात आल्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटी कंपनी कार्यालय, मनपा रुग्णालय, कलानगर, दिंडोरीरोड, कोणार्कनगर, विडी कामगारनगर अग्निशमन दल कार्यालयाला भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, उपआयुक्त आर. एम. बहिरम, शहर अभियंता संजय घुगे, स्मार्ट सिटी कंपनी मुख्य कार्यकारी अभियंता प्रकाश थविल, कार्यकारी अभियंता महेश तिवारी, विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्मार्टसिटी कंपनी कामकाज बघितले नंतर इंदिरा गांधी रुग्णालयात प्रयोगशाळा, प्रसूती कक्ष, बाह्यरुग्ण विभाग, औषधे वितरण, बाह्यरुग्ण तपासणी, महिला शस्त्रक्रिया विभाग, मेडिकल आदींची पाहणी केली कलानगरला सुरू असलेल्या रस्ते कामाची, कोणार्कनगर जलकुंभ सुरू असलेले काम तसेच विडीकामगारमधील अग्निशमन दलाचे कार्यलयात जाऊन पाहणी केली.
तक्रारी आनलाइन करा
पंचवटी विभागीय कार्यालयातील सामान्य प्रशासन विभाग, ई-सुविधा, विवाहनोंदणी, घरपट्टी, उद्यान, जन्म-मृत्यू नोंदणी, रेकॉर्ड- स्टोव्हर विभाग, करवसुली विभागांत चालणाºया कामाची माहिती घेतली. मनपा कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून अडचणी आहे का? याची चौकशी करून संबंधित विभागाला नागरिकांच्या आॅफलाइन तक्रारी आॅनलाइन करण्याच्या सूचना दिल्या.