‘नार-पार’ची भामरेंकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:56 AM2018-07-09T00:56:58+5:302018-07-09T00:57:37+5:30
मालेगाव : कसमादेसह गिरणा खोऱ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी वांजुळपाणी मांजरपाडा-२ व चिराई वळण योजना मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.
मालेगाव : कसमादेसह गिरणा खोऱ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी वांजुळपाणी मांजरपाडा-२ व चिराई वळण योजना मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.
डॉ. भामरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व वांजुळपाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी नार-पार खोºयाचा दौरा केला. नार-पार-अंबिका-औरंगा, नार-पार-ताण-मान नद्यांच्या जल स्रोतांची व उगमस्थानांची पाहणी केली. सुमारे ५ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. गेल्या काही वर्षांपासून नार-पार-दमण-गंगा-वांजुळपाडा, मांजरपाड्याचा पाणीप्रश्न कसमादे परिसरात पेटला आहे. कसमादेसह उत्तर महाराष्टÑाच्या शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा यासाठी शेतकरी आंदोलने करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वांजुळपाडा संघर्ष समितीने गेल्या आठ महिन्यांपासून कसमादे परिसरात जनजागृती सुरू केली आहे.
भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली होती. तर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे यांची भेट घेऊन प्रकल्प स्थळाविषयी
माहिती दिली होती. याची दखल घेत भामरे यांनी दौरा केला. सुरगाणा तालुक्यातील गिरणा नदीच्या उगमस्थानावर तसेच केम डोंगरावरील वांजुळपाणी योजनेच्या मुख्य ठिकाणाला अधीक्षक अभियंता एम. एस. आमले, कार्यकारी अभियंता पी. व्ही. मुसळे, उपअभियंता काकुळते आदी अधिकाºयांसह दौरा केला.
यावेळी वांजुळपाणी येथे धरण बांधल्यास नैसर्गिक उताराने प्रवाही वळण पद्धतीने बोगदे व पाटचारीच्या माध्यमातून औरंगा-नार-पार-ताण-मान खोºयातील पाणी धरणात सोडता येईल. ५ टीएमसी पाणी याद्वारे उपलब्ध होऊन ते गिरणा नदीत सोडता येईल. तसेच गिरणा खोºयाचा पाणीप्रश्न निकाली निघेल, अशा आशयाचे निवेदन संघर्ष समितीने डॉ. भामरे यांना दिले.
या दौºयात भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष गायकवाड, माजी जि.प. सदस्य रत्नाकर पवार, लकी गिल, जि.प. सदस्य समाधान हिरे, नीलेश कचवे, सुरेश निकम, डॉ. विलास
बच्छाव, जळगाव जि.प. अध्यक्ष उज्ज्वला पाटील, मच्छिंद्र पाटील, विवेक वारुळे, संदीप पाटील, प्रा. के. एन. अहिरे, प्रशांत पाटील, भडगाव कृउबाचे सभापती विश्वास पाटील, राजेंद्र शेलार, उमाकांत कदम आदींसह वांजुळपाडा संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
अल्पखर्चासाठी पाठपुरावा
तांत्रिकदृष्ट्या सोयीस्कर व अल्पखर्चाचा प्रकल्प राबविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून नार-पारसाठी निधी मिळवून या प्रकल्पाला मूर्त रूप दिले जाईल, अशी ग्वाही डॉ. सुभाष भामरे यांनी उपस्थितांना दिली.