वाजे विद्यालयात प्रेरणा दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:43 PM2018-04-05T22:43:22+5:302018-04-05T22:43:22+5:30
सिन्नर : येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे दिवंगत सरचिटणीस डॉ. वसंत पवार यांची जयंती प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
सिन्नर : येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे दिवंगत सरचिटणीस डॉ. वसंत पवार यांची जयंती प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक साहेबराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक संजय लोहकरे, एस. पी. पांगारकर, बी. एस. देशमुख, पी. आर. फटांगळे, एस. टी. पांगारकर, व्ही. एन. शिंदे, मनीषा बनकर, भागवत आरोटे, के. एस. शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी डॉ. पवार यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक शिंदे म्हणाले, डॉ. पवार यांनी मविप्र संस्थेच्या प्रगतीसाठी अविरत कष्ट घेतले. पवार यांनी शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सामाजिक, सहकार आदींसह इतर क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. पवार यांच्या काळात मविप्र संस्थेची गुणात्मक व संख्यात्मक प्रगती झाली आहे. त्यांचा कारभार शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर चालत होता. याप्रसंगी उपमुख्याध्यापक संजय लोहकरे, आर. व्ही. वाजे यांनी मनोगत व्यक्त केले.