प्रेरणादायी : शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुटुंबे भारावली दिंडोरीत आजी, माजी सैनिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:01 AM2018-01-31T00:01:20+5:302018-01-31T00:14:53+5:30
दिंडोरी : येथील अॅचिव्हर्स ग्रुप व जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने हुतात्मा दिन शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुक्यातील शहीद जवान यशवंत ढाकणे (तळेगाव) व संदीप ठोक (सिन्नर) यांच्या आई-वडिलांचा तसेच माजी सैनिक व सध्या देशसेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
दिंडोरी : येथील अॅचिव्हर्स ग्रुप व जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने हुतात्मा दिन शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुक्यातील शहीद जवान यशवंत ढाकणे (तळेगाव) व संदीप ठोक (सिन्नर) यांच्या आई-वडिलांचा तसेच माजी सैनिक व सध्या देशसेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक तथा प्राचार्य सी. बी. पवार उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, अॅचिव्हर्स ग्रुपने युवकांना मार्गदर्शन करून देशसेवेसाठी प्रेरणा द्यावी व युवकांना सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, महात्मा गांधी व शहीद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, कृउबा समिती उपसभापती अनिल देशमुख, डॉ. विलास देशमुख, शहीद ढाकणे यांचे वडील अर्जुन ढाकणे, शहीद ठोक यांचे वडील सोमनाथ ठोक, दिंडोरी तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देशसेवेसाठी प्राणाची आहुती दिलेल्या व शहीद झालेल्या सैनिकांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रुपच्या वतीने शहीद दिनानिमित्त शहरातून माजी सैनिक, ग्रुपचे विद्यार्थी व शाळेचे विद्यार्थी यांची रॅली काढण्यात आली. रॅलीच्या सर्वात पुढे चालणाºया जीपवर तिरंगी झेंडा लावण्यात येऊन देशभक्तीपर गीते लावण्यात आले होते. ही रॅली सर्वांचे आकर्षण ठरली. संतोष कथार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी धनंजय जाधव, सागर वानखेडे, सिद्धार्थ पगारे, अक्षय चारोस्कर उपस्थित होते. महेश खुळे यांनी सूत्रसंचालन केले. सागर वानखेडे यांनी आभार मानले.
रांगोळी सर्वांचे आकर्षण
अॅचिव्हर्स ग्रुपच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते अर्जुन ढाकणे व सोमनाथ ठोक यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील २१ माजी सैनिक, देशातील विविध राज्यांत देशसेवेचे कर्तव्य बजावत असणाºया ५५ सैनिकांच्या कुटुंबांचा व सैनिकांचा ग्रुपच्या वतीने रोप देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाने सैनिकी कुटुंबे भारावून गेली होती. ग्रुपच्या वतीने मैदानावर सैनिकांच्या बंदुकीची प्रतिकृती रेखाटली होती, ती रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली.