डोंगरगावच्या भूमिपुत्राची प्रेरणादायी यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:38+5:302021-06-22T04:10:38+5:30

सुनील सुरेश सावंत हा युवक २००८ मध्ये भारतीय सेनेत दाखल झाला. बेळगाव येथे त्याचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याचा अपघातात ...

Inspirational success story of Bhumiputra of Dongargaon | डोंगरगावच्या भूमिपुत्राची प्रेरणादायी यशोगाथा

डोंगरगावच्या भूमिपुत्राची प्रेरणादायी यशोगाथा

Next

सुनील सुरेश सावंत हा युवक २००८ मध्ये भारतीय सेनेत दाखल झाला. बेळगाव येथे त्याचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याचा अपघातात पाय मोडला. परंतु उपचारानंतरही त्यात सुधारणा न झाल्याने अखेर नाईलाजास्तव त्याला वैद्यकीय कारणामुळे घरी परतावे लागले. पुढे शारीरिकदृष्ट्या फिट झाल्यानंतर सुनीलने नोकरी-व्यवसायाच्या नव्या वाटांचा शोध सुरू केला. त्यातूनच त्याला सैनिक सेवेचा संदर्भ असल्याने गुजरात राज्यात महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवण्याचे काम मिळाले. सध्या गुजरात राज्यातील व्हीआयपी व्यक्तींना सुरक्षा पुरवण्याचे काम सुनील पेलत आहेत. त्यात अनेक मंत्री, क्रिकेटर्स, कलाकार, सेलिब्रिटी, उद्योजक, व्यावसायिक यांचा समावेश आहे. त्याने या व्यवसायातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. सुनीलने आपल्या व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही मोठे काम उभे केले. गुजरातमध्ये कोरोनाकाळात अनेक गरजू व गरीब लोकांना धान्य, कपडे तसेच इतर वस्तू रूपात मदत करत सामाजिक बांधिलकी जपली. संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झाले परंतु तरीही जनतेच्या सेवेत खंड पडू दिला नाही. सुनीलने आपल्या गावासाठीही मोठे काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. दरम्यान, सुनीलच्या या सेवाभावी वृत्तीची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे व्हाईस प्रेसिडेंट दिव्यांग गांधी यांनी त्यास नुकतेच सन्मानित केले आहे. डेटॉल इंडिया या कंपनीने देखील त्यांच्या उत्पादनावर सावंत पती-पत्नीचे फोटो छापत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

कोट...

आजकालच्या प्रत्येक युवकाने मन, मेंदू आणि मनगट बळकट बनवणे यावर भर द्यायला हवा. केवळ नोकरीवर विसंबून न राहता व्यवसाय हा पर्याय सतत डोळ्यासमोर असू द्यावा.

- सुनील सावंत, डोंगरगाव

कोट....

देशाचे संरक्षण करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी देशांतर्गत सुरक्षा निभावण्याचे कार्य तो पार पाडत आहे. त्याची जीवनाची वाटचाल युवकांना प्रेरक आहे.

- एकनाथ सावळा, शिक्षक, डोंगरगाव

फोटो- २१ सुनील सावंत

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे व्हाईस प्रेसिडेंट दिव्यांग गांधी यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना सुनील सावंत व इतर.

Web Title: Inspirational success story of Bhumiputra of Dongargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.