विद्यार्थ्यांना लाभली वाचनाची प्रेरणा
By admin | Published: October 16, 2016 10:55 PM2016-10-16T22:55:35+5:302016-10-16T23:08:26+5:30
अब्दुल कलाम जयंती : शाळांमध्ये वाचन उपक्रम, वाचनालयांचे लाभले सहकार्य
नाशिक : डॉ. एजीजे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिवस कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन प्रेरणा दिन संकल्पना शासनाकडून राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या दिवशी विविध विषयांवर पुस्तके वाचण्याचा आनंद लुटला.
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल
नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय येथे भारतरत्न अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र पंड्या यांनी मार्गदर्शन केले.
वाचनाच्या आवडीमुळेच आपणाला संशोधनाची आवड निर्माण झाली, असे पंड्या यांनी सांगितले. यावेळी पंड्या यांनी त्यांच्या ‘आपले नाशिक’ या पुस्तकाच्या ११ प्रती शाळेच्या ग्रंथालयाच भेट दिल्या. व्यासपीठावर जयंत मोंढे, प्राचार्य प्र.ल. ठोके, ग्रंथपाल विलास सोनार उपस्थित होते. सूत्रसंचालन रुपाली झोगडेकर यांनी केले. (प्रतिनिधी)