कार्यशाळेत बनविलेल्या गणेश मूर्तींची केली प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:15+5:302021-09-14T04:17:15+5:30

साधना कला मंच मालेगावच्यावतीने या. ना. जाधव विद्यालयात गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यात सागर पवार व श्याम ...

Installation of Ganesh idols made in the workshop | कार्यशाळेत बनविलेल्या गणेश मूर्तींची केली प्रतिष्ठापना

कार्यशाळेत बनविलेल्या गणेश मूर्तींची केली प्रतिष्ठापना

Next

साधना कला मंच मालेगावच्यावतीने या. ना. जाधव विद्यालयात गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यात सागर पवार व श्याम शिंपी या कलाशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी ५५ विद्यार्थ्यांनी स्वत: मूर्ती बनविल्या. विद्यार्थ्यांनी स्वत: या मूर्तींना रंगकाम करून आपआपल्या घरी विधीवत पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली. अत्यंत कमी खर्चात व स्वत: तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांना देऊन गेला, असे स्वाती वाणी यांनी सांगितले.

इन्फो

गणेशाची मूर्ती स्वत: तयार करण्यात एक वेगळेच समाधान आम्हास लाभले असून, आपणही एक चांगली कृती करू शकतो, याचा आत्मविश्वास या कार्यशाळेमुळे आम्हा सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मिळाला. आमच्या घरी हीच गणरायाची मूर्ती स्थापना केल्याचे हर्षल शर्मा, साक्षी लाड, यश म्हसदे, करण अहिरे, क्षितिजा सोनार, अवनी वाणी या विद्यार्थ्यांनी सांगितले.

फोटो फाईल नेम : १३ एमएसईपी ०४ . जेपीजी

फोटो फाईल नेम : १३ एमएसईपी ०५ . जेपीजी

130921\13nsk_10_13092021_13.jpg~130921\13nsk_11_13092021_13.jpg

फोटो फाईल नेम ~फोटो फाईल नेम

Web Title: Installation of Ganesh idols made in the workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.