अभोण्यात सात मंडळांकडून प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:12 AM2021-09-13T04:12:47+5:302021-09-13T04:12:47+5:30

गणेशस्थापनेच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहरातून सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन करण्यात आले. दरम्यान, यंदा शहरात ०७ गणेश ...

Installation from seven circles in Abhona | अभोण्यात सात मंडळांकडून प्रतिष्ठापना

अभोण्यात सात मंडळांकडून प्रतिष्ठापना

Next

गणेशस्थापनेच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहरातून सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन करण्यात आले. दरम्यान,

यंदा शहरात ०७ गणेश मंडळांनी मंडप, आरास, देखावे सजावट आदी न करता साध्या पद्धतीने श्रींची स्थापना केली आहे, तर अभोणा पोलीसअंतर्गत ४२ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली आहे.

देशावर व राज्यावर असलेले कोरोना संकट विसरत, संकट सारे टळू दे. असे साकडे घालत गणेशभक्तांकडून गणरायांचे अभोणा शहर परिसरात स्वागत झाले. गणरायांच्या स्वागतासाठी येथील मुख्य बाजारपेठेत पूजा साहित्य, मिठाई तसेच सजावटीची दुकाने थाटली होती. त्या ठिकाणी दिवसभर गर्दी दिसून आली, तर दुसरीकडे गणरायांचे स्वागत करताना भाविक व विविध भक्त मंडळांना धो-धो पावसाचा सामना करावा लागत होता. डीजे, ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत गणरायांची दरवर्षी उत्साहात प्राणप्रतिष्ठा करण्यात येत होती. मात्र, मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कडक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत गणेशभक्तांनी अगदी साध्या पद्धतीने विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना केली.

Web Title: Installation from seven circles in Abhona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.