वावी रुग्णालयात आत तात्काळ जन्माचा दाखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 09:17 PM2020-01-14T21:17:05+5:302020-01-15T00:13:25+5:30

सिन्नर तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीनंतर लगेचच बाळाचा जन्माचा दाखल वितरण करण्यास प्रारंभ करण्यात आला. बाळाचे जन्माचे दाखले त्वरित मिळणार असल्याची घोषणा जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्यानंतर वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.

Instant birth certificate inside Wavi Hospital | वावी रुग्णालयात आत तात्काळ जन्माचा दाखला

सिन्नर तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकांना बाळाच्या जन्माच्या दाखल्याचे वितरण करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य. समवेत कर्मचारी व आशा कार्यकर्त्या.

Next
ठळक मुद्देसुविधा : प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा उपक्रम

सिन्नर : तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीनंतर लगेचच बाळाचा जन्माचा दाखल वितरण करण्यास प्रारंभ करण्यात आला. बाळाचे जन्माचे दाखले त्वरित मिळणार असल्याची घोषणा जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्यानंतर वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य यांच्या हस्ते दाखल्याचे वितरण करण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर एक दिवसाच्या आत त्या बाळाचा जन्माचा दाखला त्वरित देण्यात आला. एखादी मुलगी माहेरी प्रसूती झाल्यानंतर काही दिवसांनी बाळाच्या जन्माचा दाखला मिळविणे फार कठीण होऊन बसते. शासनाच्या या उपक्रमाने आता ही पालकांची दाखल्यासाठी होणारी धावपळ थांबणार आहे. जन्माचा दाखला ज्या ठिकाणी प्रसूती झाली त्याच ठिकाणी तत्काळ मिळणार आहे. शक्यतो प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बच्छाव व डॉ. वैद्य यांनी केले आहे.
आतापर्यंत कोणत्याही दवाखान्यात बाळ जन्माला आल्यावर त्याची नोंदणी करण्यासाठी नगरपालिका अथवा ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करणे सक्तीचे होते. ग्रामस्थांची हेळसांड थांबवावी यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आता जन्माचे दाखले त्वरित देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी बाळ प्राथमिक आरोग्य विभागात जन्माला येणे महत्त्वाचे आहे. प्रसूती झाल्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज मिळेपर्यंत बाळाचा जन्माचा दाखला मिळणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य यांनी सांगितले. वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्माच्या दाखल्याचे वितरण करण्यात आली. यावेळी डॉ. श्रीमंत शेळके, डॉ. छाया राशिनकर, वैभव गरड, प्रकाश तमनर, राजेंद्र गोराणे, मनीषा देवरे, सुशीला जाधव, बी. बी. पाटील, नंदिनी बिडवई, संजना पाटोळे, वैशाली गायकवाड, आशा पर्यवेक्षिका सारिका घेगडमल, आशा शेळके, अर्चना काटे, आबासाहेब हाडोळे आदींसह आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Instant birth certificate inside Wavi Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.