312 प्रकरणांचा झटपट निकाल
By admin | Published: July 2, 2014 09:57 PM2014-07-02T21:57:37+5:302014-07-03T00:09:36+5:30
312 प्रकरणांचा झटपट निकाल
विजय मोरे
नाशिक, दि. ०२ - महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्हाभरात १६ ते ३० जून दरम्यान ‘न्याय आपल्या दारी’ या फि रते विधी सेवा व लोकअदालत (मोबाईल व्हॅन) उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्ह्यातील विविध तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये दिवाणी व फ ौजदारी स्वरूपाचे एकूण ६७३ दावे ठेवण्यात आले होते़ त्यापैकी ३१२ दावे सामोपचाराने निकाली निघाल़े या निकाली दाव्यांच्या आकडेवारीवरून सामोपचाराने वाद मिटविण्यात पक्षकारांकडून चांगला प्रतिसाद दिला जात असल्याचे समोर येते़विधी सहाय्य हे न्यायदान प्रक्रियेचे एक अत्यावश्यक अंग आहे़ या महत्त्वाच्या अंगाचे उद्दिष्ट म्हणजे समाजातील दुर्बल पददलित घटकांना न्याय मिळवून देणे़ जोपर्यंत नागरिकांना शिक्षण व रोजगारासारखे मुलभूत अधिकार तसेच त्यांना सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देता येत नाही, तोपर्यंत लोकशाहीस खरा अर्थ प्राप्त होत नाही़ नागरिकांच्या विशेषत: दुर्बल व गोरगरीबांच्या हक्कांचे व हितांचे रक्षण व जोपासना करण्याचे काम महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फ त केले जाते़
समाजातील निरक्षरतेमुळे बहुसंख्य नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव नसते़ त्यांना या अधिकारांची जाणीव करून देण्याची तसेच गरजूंना विधीसेवा पुरविण्याची आवश्यकता आहे़ दुर्बल घटक तसेच गरीब व गरजू लोकांना त्यांना हवे असलेल्या विधी सहाय्याकरीता विधी प्राधिकरणाकडे जाऊन दाद मागणे अवघड ठरत असल्यास विधी प्राधिकरणच त्यांच्या दाराशी जाईल़ या गोष्टींची जाणीव ठेवून ‘विधीसाक्षरता’ व ‘लोकअदालत’ यासाठी फि रत्या वाहनाची संकल्पना पुढे आली व तिची अंमलबजावणी सुरू झाली़
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात १६ ते ३० जूनदरम्यान मोफ त विधी सेवा केंद्र आणि लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ या कालावधीत ‘न्याय आपल्या दारी’ ही मोबाइल व्हॅन प्रत्येक तालुक्यात नेऊन लोकअदालत घेण्यात आली़ त्यात फे रफ ारासंबंधी प्रकरणापासून ते जमाबंदी प्रकरणे, किरकोळ आपसात मिटविण्याजोगे फ ौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, बँक कर्ज प्रकरणे, आणि दाखलपूर्व किंवा दाखल झालेली प्र्रकरणे यांचा समावेश होता़
जिल्ह्यात १६ ठिकाणी गेलेल्या फि रत्या विधी सेवा केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या लोकअदालतीत ६४७ फ ौजदारी व २६ दिवाणी असे एकूण ६७३ दावे ठेवण्यात आले होते़ त्यौपकी ३१२ दावे सामोपचाराने निकाली निघाले़ त्यात २९५ फ ौजदारी व १७ दिवाणी दाव्यांचा समावेश होता़ या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश इंदिरा जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, वकील संघाचे पदाधिकारी तसेच तालुका न्यायालयातील न्यायाधीश, कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले़