झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:47+5:302021-09-15T04:18:47+5:30

चौकट- झटपट येणारे सोयाबीन लवकर येणारे वाण म्हणून या वाणांची ओळख आहेत. साधारणत: ८० ते ८५ दिवसांमध्ये या ...

Instant soybeans; Farmers' goods even when it rains! | झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल!

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल!

googlenewsNext

चौकट-

झटपट येणारे सोयाबीन

लवकर येणारे वाण म्हणून या वाणांची ओळख आहेत. साधारणत: ८० ते ८५ दिवसांमध्ये या वाणाचे पीक हाती येते. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकाचे लवकर नियोजन करता येते. हे वाण पावसाचा ताण सहन करू शकते. मात्र उत्पादकता थोडी कमी असते. एसजी ९५६०, जेएस.३४ आदी वाणांचा यात समावेश होतो.

चौकट-

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

बहुतेक शेतकरी खरीप हंगामात या प्रकारच्या वाणांची निवड करतात. साधारणत: ९० ते १०० दिवसांमध्ये हे पीक हाती येत असते. अतिवृष्टीच्या तडाख्यात हे वाण सहसा सापडत नाही. जेएस ३३५, एमएयूएस ७१, एमएयूएस ११० आदी विविध प्रकारचे वाण यात उपलब्ध आहेत.

चौकट-

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

पेरणीनंतर ११० ते ११५ दिवसांत येणारे पीक जास्त कालावधीचे माणले जाते. फुले अग्रणी, एमएसीएस ११८ आदींचा यात समावेश होतो. हे पीक उशिराने बाजारात येत असल्याने शेतकऱ्यांना बाजारात अनेकांशी स्पर्धा करावी लागते त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. कधी कधी परतीच्या पावसातही हे पीक सापडण्याची शक्यता असते.

जिल्ह्यात वाढला सोयाबीनचा पेरा

वर्ष पेरा (हेक्टरमध्ये)

२०१७-६८४७९

२०१८-६९४५२

२०१९ -७३५३६

२०२०-८६१८४

२०२१ -९७८०१

कोट-

सोयाबीनला भाव चांगला मिळाला तर हे पीक आर्थिक उत्पन्न तर देतेच पण यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत होत असते. याशिवाय जनावरांना भुसाही मिळतो. यामुळे सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांना परवडणारे आहे. - रामदास डुकरे, शेतकरी

कोट-

मध्यम कालावधीत येणाऱ्या सोयाबीन वाणापासून उत्पादन चांगले मिळते. साेयाबीन काढल्यानंतर लगेचच विक्री केले पाहिजे असेही नाही. वाढ वाढण्याची वाट पाहता येते. बाजारातील आवक पाहुन विक्रीचा निर्णय घेता येतो याशिवाय पुढील पिकासाठी शेत लवकर मोकळे होते. - माणिकराव रसाळ, शेतकरी

कोट-

भाव वाढलेले असले म्हणून काही सोयाबीनचे पवीक लगेचच हाती लागत नाही. ८०-९० दिवसांमध्ये येणारे काही वाण बाजारात उपलब्ध आहेत. कृषी विद्यापीठांमध्ये सोयाबीनबाबत संशोधन सुरू असून त्यातून कमी कालावधीत येणारे वाण विकसित झाले आहेत, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. - कैलास शिरसाठ, कृषी उपसंचालक

Web Title: Instant soybeans; Farmers' goods even when it rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.