पुनंद पोटचारी काढण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:49 PM2020-02-19T23:49:54+5:302020-02-20T00:10:47+5:30

ओतूर, दुमी व राक्षसभुवन प्रकल्पासह कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देत ओतूर, दुमी व राक्षसभुवनसंदर्भातील तांत्रिक त्रुटी दूर करून जून २०२० अखेर सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यंत्रणेला दिले.

Instructions for conducting surveys for retardation | पुनंद पोटचारी काढण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश

मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात आयोजित बैठकीत दत्तात्रेय भरणे, आ. नितीन पवार, रवींद्र देवरे, यशवंत गवळी, चिंतामण गावित, भूषण पगार, हेमंत पाटील, संतोष देशमुख, सुनील देवरे, रविकांत सोनवणे, विलास रौंदळ आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांचे आश्वासन : पाणी नियोजन करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

कळवण : ओतूर, दुमी व राक्षसभुवन प्रकल्पासह कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देत ओतूर, दुमी व राक्षसभुवनसंदर्भातील तांत्रिक त्रुटी दूर करून जून २०२० अखेर सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यंत्रणेला दिले.
तालुक्यातील ओतूरच्या धरणाच्या दुरुस्तीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाच्या कामाच्या शुभारंभाला मी स्वत: येणार असल्याची ग्वाही पाटील यांनी ओतूर परिसरातील शिष्टमंडळाला दिली.
कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रकल्पासंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाचे सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
ओतूर, दुमी, राक्षसभुवनसह कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचन योजना, वळण योजना, प्रकल्पातील पाणी आरक्षण, पुनंद प्रकल्पअंतर्गत कालवे व त्या अंतर्गत पोटचारी काढणे, लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या गेट व कालव्याची दुरु स्ती, पाणीपुरवठा योजनाचे आरक्षण, चणकापूर व पुनंद प्रकल्प पाणी नियोजन व नदीवर बंधारे, सुरगाणा तालुक्यात नार व पार नदीवर बंधारे या संदर्भात आमदार नितीन पवार, आदिवासी नेते चिंतामण गावित, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, राजेंद्र भामरे, गोपाळ धूम, आदींनी प्रश्न उपस्थित करून मंत्री पाटील व यंत्रणेचे लक्ष वेधले.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात जलसंपदा विभागाच्या यंत्रणेकडून सखोल माहिती घेऊन नकाशाची पहाणी केली व माहिती जाणून घेतली.
महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे कळवण व सुरगाणा तालुक्यातील पाणीप्रश्न, शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येईल, असा विश्वास पाटील यांनी बैठकीत दिला.

कळवण व सुरगाणा तालुक्यातील जनतेला हक्काचे पाणी मिळत नाही. त्यांची मागणी रास्त असून, याबाबत तातडीने सर्वेक्षण व नियोजन करा. सुरगाणा तालुक्यात ठिकठिकाणी पाणी अडवून सिंचनाचा लाभ स्थानिक जनतेला करून देत स्थलांतर रोखणे ही आमदार नितीन पवार, चिंतामण गावित, गोपाळ धूम यांची मागणी योग्य असल्यामुळे याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यंत्रणेला पाटील
यांनी दिले.

Web Title: Instructions for conducting surveys for retardation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.