‘त्या’ शेतकºयांना सन्मानित करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:41 AM2017-11-01T00:41:19+5:302017-11-01T00:42:20+5:30
महापालिकेकडे भूसंपादनाकरिता निधी शिल्लक नाही. त्यामुळे स्वत:हून टी.डी.आर. घेण्यासाठी येणाºया शेतकºयांना टीडीआरच्या प्रक्रियेसाठी येणारा खर्च महापालिकेने सोसावा आणि अशा शेतकºयांचा सभागृहात सन्मान करण्याचे निर्देश शहर सुधार समितीच्या बैठकीत सभापती भगवान दोंदे यांनी नगररचना विभागाला दिले. दरम्यान, ताब्यात नसलेल्या डी.पी.रोडचे सीमांकन करण्याचेही आदेश सभापतींनी दिले.
नाशिक : महापालिकेकडे भूसंपादनाकरिता निधी शिल्लक नाही. त्यामुळे स्वत:हून टी.डी.आर. घेण्यासाठी येणाºया शेतकºयांना टीडीआरच्या प्रक्रियेसाठी येणारा खर्च महापालिकेने सोसावा आणि अशा शेतकºयांचा सभागृहात सन्मान करण्याचे निर्देश शहर सुधार समितीच्या बैठकीत सभापती भगवान दोंदे यांनी नगररचना विभागाला दिले. दरम्यान, ताब्यात नसलेल्या डी.पी.रोडचे सीमांकन करण्याचेही आदेश सभापतींनी दिले. महापालिकेच्या शहर सुधार समितीची बैठक सभापती भगवान दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, पंडित आवारे यांनी टीडीआर घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकºयांना प्रक्रिया खर्च माफ करण्याची अथवा सदर खर्च महापालिकेने करण्याची मागणी केली. महापालिकेला भूसंपादनाकरिता कोट्यवधी रुपयांची आवश्यकता आहे. अंदाजपत्रकातील सध्याची तरतूदही संपलेली आहे. आरक्षित जागांचा रोख मोबदला देण्याऐवजी शेतकºयांना टीडीआर घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. त्यावर, सभापतींनी सदर शेतकºयांना प्रक्रियेसाठी येणारा खर्च महापालिकेने करावा तसेच शेतकºयांना सभागृहात निमंत्रित करत सन्मानित करण्याचे निर्देश दिले. शहरातील डी.पी.रोडच्या डीमार्केशनबाबतही (सीमांकन) आवारे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर, ७० टक्के डी.पी.रोड महापालिकेच्या ताब्यात आहेत, परंतु उर्वरित ताब्यात नसलेल्या डी.पी.रोडचे सर्वेक्षण करून त्यांचे सीमांकन करण्यात यावे आणि त्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक करावी, अशा सूचना सभापतींनी दिल्या. मच्छिंद्र सानप यांनी प्रभाग क्रमांक ३ मध्ये कृष्णनगर उद्यान परिसरात पॅगोडा, गजिबो उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. सदर प्रस्ताव कार्यवाहीसाठी उद्यान विभागाकडे पाठविण्यात आला. शहरातील घरांना व व्यावसायिक आस्थापनांना घर नंबर देण्याची सूचना रुची कुंभारकर यांनी केली असता मिळकत सर्वेक्षणात सदर काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला उपसभापती स्वाती भामरे, सदस्य पंडित आवारे, सुवर्णा मटाले व चंद्रकांत खाडे उपस्थित होते.
मान्यवरांच्या सूचना घेणार
शहराच्या विकासात मान्यवरांचाही सहभाग असावा, यासाठी आर्किटेक्ट, विकासक, कलावंत, पत्रकार, समाजसेवी संस्था यांसारख्या मान्यवरांच्या सूचना घेण्याचा प्रस्ताव रुची कुंभारकर यांनी दिला होता. सदर प्रस्तावानुसार, शहर सुधार समितीमार्फत विविध मान्यवरांना स्वतंत्ररीत्या निमंत्रित करून त्यांच्या सूचना घेण्याचे ठरविण्यात आले.