व्यापाऱ्यांना सूचना : व्यापाºयांकडील प्लॅस्टिक साठा जमा करण्याचे आदेश सात ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:26 AM2018-04-09T01:26:07+5:302018-04-09T01:26:07+5:30
नाशिक : महापालिका हद्दीत गेल्या २३ मार्चपासून प्लॅस्टिकच्या वापरावर संपूर्णत: बंदी करण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील विक्रेते, व्यापारी आणि वितरकांना संबंधित वस्तूंचा वापर करण्यास मनाई केली.
नाशिक : महापालिका हद्दीत गेल्या २३ मार्चपासून प्लॅस्टिकच्या वापरावर संपूर्णत: बंदी करण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील विक्रेते, व्यापारी आणि वितरकांना संबंधित वस्तूंचा वापर करण्यास मनाई केली असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाईदेखील सुरू केली आहे. मात्र विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक वस्तूंचा साठा असल्यामुळे आणि पालिका तपासणी करीत असल्याने व्यापाºयांना दंड भरावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून पालिकेने आता शहरात सात ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्रे उघडली असून, या केंद्रांवर प्लॅस्टिक साहित्य जमा करण्याचे व्यापाºयांना कळविले आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने राज्यात गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यावर निर्बंध आणले आहेत. महाराष्टÑ विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायद्यानुसार अशा वस्तू वापरण्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. महापालिका हद्दीतील सर्व उत्पादक, विक्रेते, व्यापारी, वितरक यांनी प्लॅस्टिक पिशव्या, डिस्पोजल पॅकेंजिंग, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बॅग्ज, प्लॅस्टिक वेस्टन यांचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाºयांना प्रथम गुन्ह्याच्या वेळी ५ हजार रुपये दंड, दुसºयांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड तर तिसºयांचा अशाच प्रकारचा गुन्हा घडल्यास संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे प्रयोजन या कायद्यात आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात या बंदीची मोठी धास्ती आहे. विशेष म्हणजे बंदी लागू होण्यापूर्वीच व्यापारी, दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक करून ठेवला होता. तसेच काही व्यापारी तर फक्त फ्लॅस्टिक आणि डिस्पोजल भांड्याचाच व्यापार करीत असल्याने त्यांच्याकडे मोठा साठा आहे. मनपाच्या तपासणी मोहिमेत अनेक व्यापाºयांना यामुळे हजारो रुपयांचा दंड भरावा लागला आहे. अशा वस्तू फेकूनही देता येत नसल्यामुळे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी व्यापाºयांची परिस्थिती झाली होती. यासंदर्भात व्यापाºयांनी महापालिकेकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. या वस्तू संकलित करण्याची उपाययोजना करण्याची मागणी व्यापाºयांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने नाशिक पूर्वमध्ये द्वारका गुदाम, नाशिक पश्चिममध्ये कल्पनानगर, हजेरी शेड, कॉलेजरोड, सातपूर विभागात सातपूर क्लब हाऊस, जिमखाना, सिडकोत विभागीय कार्यालय, नाशिकरोडला विभागीय कार्यालय, पंचवटीसाठी पंचवटी विभागीय कार्यालय तसेच खतप्रकल्पाच्या ठिकाणी प्लॅस्टिक वस्तू संकलनाचे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
शहरातील ज्या व्यापारी, विक्रेत्यांकडे प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या, द्रोण, वाट्या आदी बंदी केलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू असतील त्यांना या वस्तू जमा करण्यासाठी २२ तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. सार्वजनिक सुटीचा दिवस सोडून सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून, या कालावधित प्लॅस्टिक जमा करावे, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, संबंधित व्यापारी आपल्याकडील प्रतिबंधित उपलब्ध प्लॅस्टिकचा साठा राज्याबाहेर विक्री करू शकतात किंवा प्राधिकृत पुनर्चक्रण करणाºया उद्योगाकडे घेऊन प्रक्रिया करू शकतात, असेही नोटिसीत म्हटले आहे.