अंत्यसंस्कारासाठी अमरधामही अपूरे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:14+5:302021-03-28T04:14:14+5:30

नाशिक अमरधाममध्ये गेल्या सात दिवसांपासून हा प्रकार घडत असून अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना थांबण्यास सांगावे लागत आहे. मध्यंतरी देखील अशाच प्रकारे ...

Insufficient immortality for funeral? | अंत्यसंस्कारासाठी अमरधामही अपूरे?

अंत्यसंस्कारासाठी अमरधामही अपूरे?

Next

नाशिक अमरधाममध्ये गेल्या सात दिवसांपासून हा प्रकार घडत असून अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना थांबण्यास सांगावे लागत आहे. मध्यंतरी देखील अशाच प्रकारे खेाळंबा झाला होता असा आरोप या भागातील नगरसेवक शाहु खैरे यांनी केला आहे. सध्या याठिकाणी १४ बेडस आणि दोन शवदाहानी तसेच एक गॅसवर चालणारी शव दाहीनी असून त्यानंतरही अंत्यसंस्कारास विलंब हेात आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना नदी किनारी आणि कन्नमवार पुलाकडे जाणाऱ्या रस्तयावर अंत्यविधी करावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे महापालिकेच्या प्रशासनाला यापूर्वी वारंवार सांगून देखील त्याची दखल घेतली जात नाही. अमरधाम या विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचाही आरोप त्यांनी केला.

इन्फो...

राख सावडायला आजच या...

नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार झाल्यानंतर राख सावडायाला दुसऱ्या दिवशी येण्याची पारंपारीक पध्दत आहे. मात्र, सध्या अमरधाम मधील ताण इतका वाढला आहे की राख सावडायाला उद्या नको आजच काही वेळाने येान जा असे फोन कंत्राटदाराचे कर्मचारी मृत व्यक्तीच्या कुटूंबियांना सांगत आहेत.

कोट...

नाशिक अमरधाममध्ये १४ बेड अंत्यसंस्कारासाठ आहेत. दोन विद्युत शव दाहीनी आणि एक गॅस दाहीनी आहेत. अचानक डेड बॉडी आणल्यावर काही वेळ थांबावे लागणे शक्य आहे. मात्र बाकी कोणतीही अडचण नाही.

- डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग

इन्फो..

नाशिक अमरधामध्ये केाणतीही अडचण नाही असे येथे काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व बेडस कामात येत आहेत, शव दाहीनी देखील सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Insufficient immortality for funeral?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.