शहरातील ‘एटीएम’ला अपुरा चलनपुरवठा
By admin | Published: April 19, 2017 01:42 AM2017-04-19T01:42:40+5:302017-04-19T01:44:00+5:30
नोकरदारांचे हाल : चलनटंचाईचे संकट पुन्हा गडद होण्याचे संकेत
नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकमधील बहुतांश सरकारी तसेच खासगी बँकांच्या अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्याचे समोर येत आहे. त्यातच सध्या १ ते १० तारखेपर्यंत पगाराचे दिवस असताना खात्यात पैसे असूनही ते हातात मिळत नाहीत़ त्यामुळे नोकरदारांसह सर्वच ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत़
बँकांबाहेर ग्राहकांच्या लांब रांगा नसल्या तरी रक्कम मिळणाऱ्या एटीएमबाहेर थांबून पैसे काढण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत. तांत्रिक कारणामुळे शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याचे अधिकारी सांगत आहेत, परंतु बँकांनी रोख व्यवहारांवर अटी-शर्ती लागू केल्यामुळे बँकेतून रोख रक्कम काढून स्वत:जवळ बाळगण्याकडे ग्राहकांचा कल वाढू लागल्याने बँकांमध्ये पुन्हा नोटांचा तुटवडा जाणवू लागल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.