शेटेंच्या अपात्रतेने प्रगतीला अपशकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:29 AM2017-08-01T01:29:13+5:302017-08-01T01:29:13+5:30

मराठा विद्या प्रसारक संस्थेची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, सत्ताधारी प्रगती पॅनलचे जाहीर केलेले उमेदवार श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने प्रगती पॅनल बॅकफूटवर आल्याची चर्चा आहे.

Insufficient to progress by disqualification of Sheets | शेटेंच्या अपात्रतेने प्रगतीला अपशकून

शेटेंच्या अपात्रतेने प्रगतीला अपशकून

Next

नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, सत्ताधारी प्रगती पॅनलचे जाहीर केलेले उमेदवार श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने प्रगती पॅनल बॅकफूटवर आल्याची चर्चा आहे. दरम्यान, श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद करणाºया शिवसेनेच्या सुरेश डोखळेंना या कामगिरीमुळे विरोधी समाज विकास पॅनलची उमेदवारी जाहीर झाली आहे. अर्थात, सुरेश डोखळे हेच आमच्या पॅनलचे उमेदवार याआधी निश्चित होते, असा दावा समाज विकास पॅनलचे नेते विद्यमान सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला आहे. समाज विकास पॅनलचा तालुका मेळावा सोमवारी (दि.३१) कोठुरे (निफाड) येथे झाला. या मेळाव्यात राजेंद्र मोगल, देवराम मोगल, जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम यांच्यासह तालुक्यातील काही आजी-माजी नेत्यांची उपस्थिती या मेळाव्याला लाभली.
दरम्यान, अध्यक्ष पदासाठी समाज विकास पॅनलकडून माजी खासदार प्रताप सोनवणे, दिलीपराव मोरे यांच्यासह दोन-तीन नावे चर्चेत असताना सत्ताधारी गटाकडून प्रताप सोनवणे यांंच्या विरोधात अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्यास फारशी कोणी उत्सुकता दाखविली नसल्याची चर्चा आहे. याउलट यावर्षी सत्ताधारी गटात सामील झालेल्या माजी अध्यक्ष माणिकराव बोरस्ते यांनी अध्यक्ष पदाऐवजी सभापती पदासाठी पसंती दर्शविल्याने समाज विकास पॅनलने विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे यांना माणिकराव बोरस्ते यांच्या समोर उमेदवारीसाठी उभे करण्याची तयारी समाजविकास पॅनलने केल्याची चर्चा आहे.
बागलाण-निफाड चर्चेत
सर्वाधिक मतदार असलेल्या निफाड तालुक्यासह बागलाण व नाशिक तालुक्यात असलेली सर्वाधिक मतदार संख्या गृहीत धरून दोन्ही पॅनलकडून या दोन्ही तालुक्यांतच पाचही पदाधिकारी पदाची उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे. तसे झाले तर निफाड व बागलाण तालुक्याची भूमिका यंदाच्या निवडणुकीसाठी निर्णायक राहील. दोन्ही पॅनलने निफाड, बागलाण व नाशिक तालुक्यांवरच लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक शहरात बहुतांश ग्रामीण भागातील नेतेमंडळी व मतदार राहत असल्याने नाशिक शहरही चर्चेत आहे.
माजी बाद, आजी आबाद
राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा अर्ज बाद झाला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शेटे हे सत्ताधारी, तर पगार हे विरोधी पॅनलचे पदाधिकारी आहेत.

Web Title: Insufficient to progress by disqualification of Sheets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.