विमा कंपन्याच होताहेत मालामाल; भरले ५० कोटी मिळाले ३४ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:39+5:302021-05-24T04:14:39+5:30
खरीप २०२०-२१ पीकविमा लागवड क्षेत्र -१६६९०७.८७ एकूण जमा रक्कम -५०७८.७५ एकूण मंजूर पीकविमा- ३४३२.९८ प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे -१५१७.४२ ...
खरीप २०२०-२१
पीकविमा लागवड क्षेत्र -१६६९०७.८७
एकूण जमा रक्कम -५०७८.७५
एकूण मंजूर पीकविमा- ३४३२.९८
प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे -१५१७.४२
राज्य सरकारने भरलेले पैसे - १७८०.६६
केंद्र सरकारने भरलेले पैसे - १७८०.६६
विमा काढणारे शेतकरी - २७०७६०
लाभार्थी शेतकरी -३५६६५
आतापर्यंत किती जणांना मिळाला विमा - १५,४६१
आतापर्यंत वाटप केलेली रक्कम - ३२६.४३
चौकट-
दोन लाखांहून अधिक शेतकरी बाद
जिल्ह्यात दोन लाख ७० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरून पीकविमा घेतला असता तरी प्रत्यक्षात केवळ ३५ हजार शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळू शकला आहे. कोट्यवधींचा हप्ता भरूनही शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही मिळत नसल्याने पीकविम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, नुकसान झाले तरी रक्कम मिळत नसल्याने हा विमा घ्यायचाच कशाला असा सूर उमटत आहे.
कोट-
दरवर्षी मी न चुकता पीकविमा काढत असतो; पण आतापर्यंत एकदाही मला पीकविम्याची भरपाई मिळालेली नाही. हप्ता भरताना जी आश्वासने दिली जातात ती पाळली जात नाही. यामुळे दरवर्षी पैसे वाया जातात आणि वरून नुकसानही होत असते. - अशोक दौंडे, शेतकरी
कोट-
आमच्या गावात मागीलवर्षी पिकांचे नुकसान झाले; पण विमा कंपनीच्या निकषात ते बसले नाही यामुळे माझ्या मक्याचा विमा काही मिळाला नाही. पीकविम्यासाठी पोटाला चिमटा देऊन पैसे भरले तरी त्याचा उपयोग होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. - विकास पगारे, शेतकरी
कोट-
दरवर्षी पिकाचा विमा काढला तरी त्याचा लाभ मिळत नाही. नुकसानभरपाई देताना अनेक नियम सांगितले जातात त्या निकषात तुम्ही बसत नसल्याने तुम्हाला भरपाई मिळणार नाही, असे सांगितले जाते. यामुळे काहीही फायदा होत नाही. - बाळसाहेब आहिरे, शेतकरी