लासलगाव बाजार समितीच्या सेवकांना विम्याचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:14 AM2021-05-07T04:14:52+5:302021-05-07T04:14:52+5:30
सध्या संपूर्ण जगात कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून बाजार समितीच्या लासलगाव मुख्य, निफाड व विंचूर ...
सध्या संपूर्ण जगात कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून बाजार समितीच्या लासलगाव मुख्य, निफाड व विंचूर उपबाजार आवारांवर तसेच तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रांवर कामकाज करणारे कायमस्वरूपी व रोजंदारीवरील सेवक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना कोविड-१९ व इतर सर्व प्रकारच्या आजारांच्या उपचारांसाठी कोणतीही आर्थिक व्यवस्था नाही. त्यांना उपचारासाठी पैशांची निकड भासू नये, ही बाब विचारात घेऊन बाजार समितीमार्फत सर्व कायमस्वरूपी व रोजंदारीवर असलेल्या १४१ कर्मचाऱ्यांचा आरोग्यविमा काढण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कायमस्वरूपी सेवकांना पाच लाख रुपयांपर्यंत व रोजंदारीवरील सेवकांना तीन लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळणार आहे. सदरची विमा पॉलिसी ही कॅशलेस असून नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नामांकित रुग्णालयात सदर विमा पॉलिसीद्वारे सेवकांना उपचार घेता येणार आहे.