सोसायटी संचालक, ग्रामपंचाय सदस्यांना विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:31+5:302021-09-09T04:19:31+5:30
राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, गुजरातच्या धर्तीवर त्याची अंमलबजावणी केली जाईल. बाजार समितीची सभा उपसभापती प्रभाकर मुळाणे यांच्या अध्यक्षतेखाली ...
राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, गुजरातच्या धर्तीवर त्याची अंमलबजावणी केली जाईल.
बाजार समितीची सभा उपसभापती प्रभाकर मुळाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.७) घेण्यात आली. त्यात बाजार समितीतील आडते व व्यापारी यांच्याकडे वसुलपात्र असलेली मार्केट फी दरमहिन्याच्या ७ तारखेपावेतो वसुल करण्यावर चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या नाशिक, त्र्यंबक, पेठ या तीन तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या व ग्रामपंचायतीच्या सुमारे ३,१०० सभासदांना पाच लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विमा कवचामुळे संबंधित सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रूपये, अपंगत्व आल्यास अडीच लाख रूपये व अपघात उपचारासाठी एक लाख रूपये मदत मिळणार आहे. या सभेस संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, संजय तुंगार, युवराज कोठूळे, भाऊसाहेब खांडबहाले, शाम गावीत, व्यापारी संदीप पाटील, हमाल व्यापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम, विमल जुंद्रे, सचिव अरूण काळे, अरविंद जैन, निकाळे, घोलप आदी उपस्थित होते.
चौकट===
यांना मिळणार मदत
अंगावर झाड पडणे, विहीरीत पडून मृत्यू, तलावात पडून मृत्यू, शेतात काम करतांना सर्पदंश मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, दुचाकी व चारचाकी वाहन अपघातात मृत्यू झाल्यास विमाकवच असलेल्या व्यक्तीच्या वारसास पाच लाख रूपये मिळू शकतील
चौकट===
बाजार समितीच्या संचालकांनी केलेल्या गुजरात दौऱ्यात राजकोट येथील गोंदल बाजार समितीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वच सभासदांचा विमा काढल्याचे सांगितले. त्याच धर्तीवर नाशिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना देखील विमा कवच देण्याचा विचार आहे.
- देवीदास पिंगळे, सभापती