नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये इंटेग्लिओ प्लेट बनिवण्याचे तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 01:04 PM2018-08-12T13:04:32+5:302018-08-12T13:08:47+5:30

देशातील चलनी नोटांच्यामाध्यमातून प्रत्येक नागरिकां पर्यंत पोहचणाऱ्या करन्सी नोट प्रेसने चलनी नोटांची गोपनीयता आणि वैशिष्ट्य अबाधित राहावी यासाठी अाधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असून नाशिक येथील करेंन्सी नोट प्रेस येथे संगणकाद्वारे अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनिवण्याच्या तंत्रज्ञानाचे व त्यासाठी आवश्यक  नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले

IntegLio plate handling technology in Nashik's currency notepress | नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये इंटेग्लिओ प्लेट बनिवण्याचे तंत्रज्ञान

नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये इंटेग्लिओ प्लेट बनिवण्याचे तंत्रज्ञान

Next
ठळक मुद्देनाशिकच्या नोट प्रेसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आशिया खंडात पहिल्यांदाच इंटेग्लिओ प्रिंटीग प्रणालीचा वापरआर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक: देशातील चलनी नोटांच्यामाध्यमातून प्रत्येक नागरिकां पर्यंत पोहचणाऱ्या करन्सी नोट प्रेसने चलनी नोटांची गोपनीयता आणि वैशिष्ट्य अबाधित राहावी यासाठी अाधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असून नाशिक येथील करेंन्सी नोट प्रेस येथे संगणकाद्वारे अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनिवण्याच्या तंत्रज्ञानाचे व त्यासाठी आवश्यक  नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारत प्रतिभूमी मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळ मर्यादीतच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका तृप्ती
पी. घोष, संचालक एस. के. सिन्हा, ए. के. श्रीवास्तव, करन्सी नोट प्रेसचे महाप्रबंधक एस. पी. वर्मा, भारत प्रतिभूमी मुद्रणालयाचे महाप्रबंधक सुधीर साहू आदी अधिकारी उपस्थित होते.याठिकाणी सुरू करण्यात आलेली ही आधुनिक प्रणाली आशिया खंडातील एकमेव प्रणाली आहे. संगणकाद्वारे अत्याधूनिक तंत्रज्ञान वापरून इंटेग्लिओ प्रिंटीगसाठी लागणारी इंटेग्लिओ प्लेट तयार करण्याची ही उच्च प्रणाली आहे. या प्रणालीचा सर्वप्रथम नाशिक येथे वापर करण्यात येत आहे. हीप्रणाली देशाच्या मुद्रण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बँक, नोट मु्द्रणाच्या सुरक्षितेत अधिक भर घालणारी आहे. यावेळी  गर्ग यांनी नोटप्रेसमधील विविध उत्पादन विभागांना भेट दिली. यंत्राची सविस्तर माहिती घेतली. तसेच नोट छपाईच्या यंत्राचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले व सुरक्षा मानकांचीही माहिती त्यांनी याप्रसंगी जाणून घेतली. करेंसी नोट प्रेस जागतिक स्तरावर एक अत्याधुनिक बँक नोट मुद्रणालय म्हणून नावारूपास येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.करन्सी नोट प्रेस नाशिक हे भारतातील पहिले बँक नोट मुद्रणालय असून, त्याचे उद्घाटन सन १९२८ मध्ये झाले. आजपर्यंत भारताच्या चलना व्यतीरिक्त इतरही अनेक देशांचे चलन छापण्यात आले आहे. 

Web Title: IntegLio plate handling technology in Nashik's currency notepress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.