एकात्मिक तन व्यवस्थापन कृषिदूतांकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 10:50 PM2021-07-26T22:50:55+5:302021-07-26T22:51:19+5:30

साकोरा : ग्रामीण (कृषि ) जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे येथे आच्छादन (मल्चिंग) याचे मार्गदर्शन करण्यात आले.

Integrated body management guidance from agronomists | एकात्मिक तन व्यवस्थापन कृषिदूतांकडून मार्गदर्शन

एकात्मिक तन व्यवस्थापन कृषिदूतांकडून मार्गदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्दे पिंप्राळे येथे आच्छादन (मल्चिंग) याचे मार्गदर्शन

साकोरा : ग्रामीण (कृषि ) जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे येथे आच्छादन (मल्चिंग) याचे मार्गदर्शन करण्यात आले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि के. व्ही. पटेल कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत ऋषिकेश सोनेज यांच्या सयुंक्त विद्यमाने यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकांमधील तणाला (गवत) मारण्यासाठी फक्त रासायनिक तणनाशके न वापरता मल्चिंगचा वापर करावा. ज्याद्वारे पिकांना तसेच पर्यावरणाला हानी होणार नाही, असे सांगितले.

याप्रसंगी कीटकशास्त्र तज्ज्ञ मंगेश महाले तसेच युवा शेतकरी वैष्णव सतगीर, हितेश देवरे व इतर शेतकरी व महिला उपस्थित होत्या. हा कृषी अभ्यास दौरा पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल, कार्यक्रम समन्वयक प्रा. चंद्रशेखर पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा.,संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: Integrated body management guidance from agronomists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.