एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने घेतली खावटी किटची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 12:03 AM2021-11-28T00:03:27+5:302021-11-28T00:03:27+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांतील आदिवासी जनतेला एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाकडून खावटी किट मिळाले नसल्याने अनेक लाभार्थी वंचित असून अनेक दिवसांंपासून आदिवासी लाभार्थी खावटी किट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे, हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांनी दखल घेतली असून जानोरी गावच्या आदिवासी लाभार्थ्यांची यादी जानोरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीला लावण्यात आली असून सोमवारी (दि.२९) दिंडोरी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे लाभार्थींना खावटी किट मिळणार आहे.

लाभार्थ्याने खावटी किट घेण्यासाठी येताना स्वतःचे मूळ आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, पासपोर्ट फोटो सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या यादीत जानोरी येथील १२९ आदिवासी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.
खावटी किट अनुदानवाटपाबाबतची जानोरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीला लावली असताच जानोरी येथील आदिवासी ग्रामस्थांनी लोकमतचे आभार मानले आहे.
अनेक दिवसांपासून जानोरी येथील आदिवासी लाभार्थी खावटी किटची प्रतीक्षा करत होते. परंतु खावटी किट मिळत नसल्याने अनेक आदिवासी बांधव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पावर नाराजी व्यक्त करत होते. परंतु, लोकमतने खावटी किटपासून आदिवासी लाभार्थी वंचित हे वृत्त प्रसिद्ध होताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांनी दखल घेऊन जानोरी गावासाठी सोमवारी खावटी किट देण्यात येणार असल्याची यादी प्रसिद्ध केली आहे.
- नामदेव डंबाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य, जानोरी.
(२७ जानोरी १) बुधवारी लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी.