शिवसंपर्क अभियानांतर्गत पदाधिकाºयांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:11 AM2018-02-25T00:11:15+5:302018-02-25T00:11:15+5:30

शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संजय बच्छाव यांनी पक्ष पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधला.

 Interaction with the office under the Shiv Sampaksha Abhiyan | शिवसंपर्क अभियानांतर्गत पदाधिकाºयांशी संवाद

शिवसंपर्क अभियानांतर्गत पदाधिकाºयांशी संवाद

Next

सिन्नर : शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संजय बच्छाव यांनी पक्ष पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधला. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, तालुका प्रमुख दीपक खुळे, शहरप्रमुख गौरव घरटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सिन्नर विधानसभा क्षेत्रातील गटनिहाय आढावा घेण्यात आला. प्रत्येक गटातील अडचणी, समस्या, पक्षाची स्थिती, संघटनात्मक मजबुतीची आवश्यकता या बाबींवर संपर्कप्रमुखांनी माहिती जाणून घेतली. मुसळगाव व ठाणगाव गटातील सेझ, समृद्धी महामार्ग या प्रश्नांवर पदाधिकाºयांनी लोकांच्या भावना व पक्षाची भूमिका याबाबत माहिती दिली. यानंतर सेनेचे नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, खरेदी -विक्री संघ, बाजार समितीच्या संचालिकांसोबत स्वातंत्र्यपणे चर्चा करून संपर्कप्रमुखांनी मार्गदर्शन केले. अभियानादरम्यान येणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. सर्व निवडणूका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याने पक्षमजबुतीकडे सर्वांनी गांभीर्यपुर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते चौधरी व बच्छाव यांचा सत्कार करुन स्वागत करण्यात आले. कार्यालय प्रमुख पिराजी पवार, प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते हेमंत वाजे, सोमनाथ पावसे, बाळू उगले, किरण कोथमिरे, गोविंद लोखंडे, रुपेश मुठे, पंकज मोरे. श्रीकांत जाधव, सुजाता भगत, नलिनी गाडे, सुजाता तेलंग, विजया बर्डे, पंचायत समितीचे सभापती सुमन बर्डे, उपसभापती वेणुबाई डावरे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, वनीता शिंदे, वैशाली खुळे यांच्यासह सेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title:  Interaction with the office under the Shiv Sampaksha Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.