शिक्षकांच्या आपसी बदल्या बासनात

By admin | Published: May 29, 2015 11:47 PM2015-05-29T23:47:14+5:302015-05-29T23:48:12+5:30

शिक्षकांच्या आपसी बदल्या बासनात

Interaction with teachers | शिक्षकांच्या आपसी बदल्या बासनात

शिक्षकांच्या आपसी बदल्या बासनात

Next

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी (वर्गवारी) बदल्यांना शासनाने हिरवा कंदील दाखविला असला तरी प्रत्यक्षात या आपसी बदल्यांमुळे आदिवासी-बिगर आदिवासी वाद उद््भवण्याची शक्यता असल्याने शिक्षकांच्या आपसी बदल्या करण्यात येऊ नये, असा एकमुखी ठराव शिक्षण समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आला. शिक्षण समितीची मासिक बैठक प्रभारी सभापती प्रवीण गायकवाड यांच्या उपस्थितीत झाली. त्या बैठकीत शिक्षण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. त्यात उपशिक्षक-४०३, पदवीधर-२११, केंद्रप्रमुख-५२ व मुख्याध्यापक १५० अशी पदे रिक्त असून, बीड येथील आंतरजिल्हा बदलीने गेलेले ४६ शिक्षक तेथे अतिरिक्त ठरल्याने त्यांना पुन्हा नाशिकला नियुक्तीला देण्यात येणार आहे. त्यासाठी जागा रिक्त ठेवण्याचे आदेश सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिले. तसेच जिल्'ात आंतरजिल्हा बदलीने अद्याप १६० शिक्षक हजर झालेले नाहीत. त्यांचे ना हरकत आदेश रद्द करण्यात यावेत, असेही प्रवीण गायकवाड यांनी शिक्षण विभागाला सूचित केले. तसेच ३० जूनपर्यंत जिल्'ातील प्राथमिक शाळांमधील किती स्वच्छतागृहांची बांधकामे बाकी पूर्ण करावयाची असून, त्यासाठी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व गटशिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्'ातील प्रत्येक प्राथमिक शाळेतील स्वच्छतागृह बांधकाम असल्याबाबत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण)गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार असून, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्र सरकारला अहवाल पाठविणार आहेत. १५ आॅगस्ट २०१५ पर्यंत जिल्'ातील प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. जेथे स्वच्छतागृह नसेल तेथील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छतागृह उभारणीबाबत आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना प्रवीण गायकवाड यांनी दिल्या. बैठकीस चंद्रकांत वाघ, सुनीता पाटील, प्रा. अशोक जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल, माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Interaction with teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.