आंतरविभागीय नेटबॉल (मुले) स्पर्धेत नाशिक विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:19 PM2018-12-11T13:19:36+5:302018-12-11T13:20:35+5:30
नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय मुलांची नेटबॉल स्पर्धेत पुणे शहर,पुणे ग्रामीण,नगर व नाशिक या चार संघात एकुण सहा सामने झाले. त्यात नाशिक विभागाने प्रथमच प्रथम क्र मांक पटकवला आहे.
नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय मुलांची नेटबॉल स्पर्धेत पुणे शहर,पुणे ग्रामीण,नगर व नाशिक या चार संघात एकुण सहा सामने झाले. त्यात नाशिक विभागाने प्रथमच प्रथम क्र मांक पटकवला आहे. या सामन्यांचा निकाल पुढील प्रमाणे आहे. नाशिक विरूध्द पुणे शहर ४५-२६ , पुणे जिल्हा विरूध्द अहमदनगर ३७-२०, नाशिक विरूध्द अहमदनगर ४८-२०, पुणे जिल्हा विरूध्द पुणे शहर ३०-२८, पुणे शहर विरूद्ध अहमदनगर ३७-२०, नाशिक विरूध्द पुणे जिल्हा ३६-३२. पुणे जिल्हा संघाने द्वितीय, पुणे शहर संघाने तृतीय तर अहमदनगर संघाने चतुर्थ क्र मांक मिळवला. स्पर्धेसाठी नेटबॉलचे आंतरराष्ट्रीय पंच अश्पाक शेख, राष्ट्रीय पंच स्विप्नल कर्पे, तसेच संकेत कदम व अनिल औशिकर यांनी गुणलेखन व टाईम किपर म्हणून काम पाहीले. संयोजन शारीरीक शिक्षण संचालक प्रा.दिनेश उकिर्डे यांनी केले. प्रतिक्षा घुगे, पल्लवी जाधव,सायली कोरडे,आरती नंद, भाग्यश्री शिंदे,शुभांगी पाटील,पुनम तळेकर,पुजा तळेकर,यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.