थकीत कर्जावर व्याज आकारणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:26 AM2018-03-17T00:26:18+5:302018-03-17T00:26:18+5:30

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी २०१७ या योजनेतील कर्जमाफी व एक वेळ समझोता योजनेस पात्र असणाऱ्या शेतकºयांच्या मध्यम मुदत पीककर्ज खात्यावर दि. १ आॅगस्ट २०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पात्र थकीत रकमेवर शासन निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये, असा शासन निर्णय झाला आहे.

 Interest is not levied on loans | थकीत कर्जावर व्याज आकारणी नाही

थकीत कर्जावर व्याज आकारणी नाही

Next

देवळा : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी २०१७ या योजनेतील कर्जमाफी व एक वेळ समझोता योजनेस पात्र असणाऱ्या शेतकºयांच्या मध्यम मुदत पीककर्ज खात्यावर दि. १ आॅगस्ट २०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पात्र थकीत रकमेवर शासन निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये, असा शासन निर्णय झाला आहे. शासनाने असे निर्देश संबंधित बँका व संस्थांना देण्यात आले असल्याची माहिती देवळ्याचे सहायक निबंधक संजय गिते यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू असून, पात्र शेतकºयांना कर्जमाफी व एकरकमी परतफेड योजनेमधून कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. १ जिल्हा बँक व सहकारी सोसायटीमार्फत पात्र शेतकºयांच्या थकीत रकमेवर १ आॅगस्ट २०१७ ते या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीत व्याज आकारणी करण्यात येत आहे. यामुळे ज्या शेतकºयांचे थकीत कर्ज व व्याजाची एकूण रक्कम दीड लाख रुपयांच्या आत असूनही या रकमेवर १ आॅगस्टपासून ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा बँक व सहकारी सोसायटी व्याज आकारणी करत होती. २ यामुळे योजनेतील दीड लाखाच्या आतील पात्र लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दीड लाखाच्या आत थकीत कर्जाची एकूण रक्कम असल्यामुळे व्याज आकारणी अन्यायकारक असल्याची शेतकºयांमध्ये भावना निर्माण झाली होती. ही व्याज आकारणी करू नये अशी या शेतकºयांची मागणी होती. योजनेचा लाभ घेण्याच्या आशेने अनेक शेतकºयांनी व्याजाचा भरणा संस्थेकडे करून कर्जमाफी मिळवली; परंतु अशा व्याज आकारणीमुळे सदर योजनेतील पात्र लाभार्थींचे कर्ज खाते कर्जमाफी मिळूनही निरंक झाले नाही.
दीड लाखांची अट
शासन निर्णयानुसार बॅँक व सहकारी संस्थांनी ही व्याज आकारणी करू नये, असे निर्देश देण्यात आल्यामुळे कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. ज्या बँकांनी व संस्थांनी पात्र शेतकºयांकडून व्याज वसूल केले त्यांना ही व्याजाची रक्कम ज्या शेतकºयांचे कर्ज दीड लाख रुपयांच्या आत आहे त्यांना परत करावे लागणार आहे.

Web Title:  Interest is not levied on loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.