रघुवंशात श्रीरामाच्या कुळाचे रोचक वर्णन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:42+5:302021-07-14T04:17:42+5:30
नाशिक : एकोणीस सर्गांच्या रघुवंशात कालिदासाने श्रीरामाच्या पूर्वीच्या व नंतरच्या अशा एकूण २८ राजांची वर्णने केलेली आहेत. त्या रघुकुलातील ...
नाशिक : एकोणीस सर्गांच्या रघुवंशात कालिदासाने श्रीरामाच्या पूर्वीच्या व नंतरच्या अशा एकूण २८ राजांची वर्णने केलेली आहेत. त्या रघुकुलातील राजांचे गुण, कालिदासाच्या विविध उपमा आणि त्यांच्या भाषासौंदर्याने अत्यंत राेचकपणे मांडण्यात आले असल्याचे कविकुलगुरू कालिदास यांच्या साहित्याचे अभ्यासक अंकुश जोशी यांनी सांगितले.
सार्वजनिक वाचनालय, नाशिक व संस्कृत भाषा सभा नाशिक या दोन संस्थांच्या परस्पर सहकार्यातून कालिदास दिनानिमित्ताने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. तर, प्रास्ताविक संस्कृत भाषा सभेच्या वतीने सभेचे सदस्य अमित नागरे यांनी केले. वक्त्याचा परिचय संस्कृत भाषा सभेच्या सदस्या रूपाली झोडगेकर यांनी करून दिला. याप्रसंगी डॉ. नीलिमा कुलकर्णी यांनी त्यांच्या मातोश्री सिंधू श्याम जोशी यांनी कालिदासावर केलेल्या कवितेचे वाचन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मीनल पत्की यांनी केले.