चांदवड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पाय डे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 07:16 PM2021-03-15T19:16:22+5:302021-03-15T19:16:22+5:30
चांदवड : येथील आबड लोढा व जैन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये गणित विभाग व आय.क्यू.ए.सी.तर्फे आंतरराष्ट्रीय पाय डे साजरा झाला. यावेळी ऑनलाइन राष्ट्रीय प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते.
चांदवड : येथील आबड लोढा व जैन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये गणित विभाग व आय.क्यू.ए.सी.तर्फे आंतरराष्ट्रीय पाय डे साजरा झाला. यावेळी ऑनलाइन राष्ट्रीय प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते.
देशभरातून ७८७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली व यातील २८२ विद्यार्थी हे ऑनलाइन सर्टिफिकेट मिळविण्यासाठी पात्र ठरले. या प्रश्नमंजुषा आयोजित करण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दल आवड, त्याचबरोबर गणित विषयाबद्दलची भीतीही कमी करण्यास मदत होते, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही देशातील इतर विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करण्याची संधी मिळते.
या प्रश्नमंजुषेसाठी गणित विभाग प्रमुख प्रा.चैतन्य कुंभार्डे, समन्वयक प्रा.मधुकर झांजे, प्रा.सपुरा अन्सारी, प्रा.ज्ञानेश्वर भोकनळ, प्रा.चेतना पवार व प्रा.मुक्ता चव्हाण यांनी परिश्रम घेतले.