आंतरराष्टय शैक्षणिक केंद्राचे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:50 AM2018-08-07T01:50:11+5:302018-08-07T01:50:45+5:30
महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्टय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार व आदान-प्रदान सोहळ्याचा समारंभ मंगळवारी (दि.७) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडणार आहे.
नाशिक : महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्टय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार व आदान-प्रदान सोहळ्याचा समारंभ मंगळवारी (दि.७) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडणार आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन राज्यपाल चेन्नोमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या पर्यटन खात्याचे मंत्री पॉल पॅपेलिया, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबाबत कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले, या सोहळ्याला एकूण १३ देशांचे प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. यामधील निवडक अशा ४१ संस्थांमार्फत करार करण्यात येणार आहेत. यामध्ये हेल्थ करिअर्स, मलेशिया, फिलिपाईन्स, दुबई तसेच ग्लोबल एज्युकेशन अॅन्ड एम्पॉयर्मेंट कं सोर्शियम आॅस्ट्रेलिया, इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मॅनेजमेंट
आॅस्ट्रेलिया, एडिनबर्ग युनिव्हर्सिटी किंग्डम, नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ नॅचरल मेडिसीन, पोर्टलॅन्ड, ओरेगॉन यूएसए, सिडनी किमेल मेडिकल स्कूल, एचआरआय कॅन्सर सेंटर नागपूर, आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदा नवी दिल्ली यांसह आदी भारतीय व विदेशी संस्थांचा सहभाग आहे. या संस्थांसमवेत सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात येणार आहे.