गतवर्षी इंटरनेटबंदी; यंदा शुभेच्छांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:16 AM2017-10-01T01:16:18+5:302017-10-01T01:16:24+5:30

११ आॅक्टोबर २०१६. विजयादशमीचा सण शहरात साजरा झाला होता तो तणावाच्या स्थितीत. तळेगाव अंजनेरी येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यामुळे विजयादशमीला व्हॉट््स अ‍ॅपवरून संदेशाची देवाणघेवाण होऊ शकली नव्हती. यावर्षी मात्र, आदल्या दिवसापासूनच विजयादशमीनिमित्त शुभेच्छा संदेशांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि व्हॉट््स अ‍ॅपवरच प्रतीकात्मक स्वरूपात सोने लुटण्याचा आनंद व्यक्त केला गेला.

Internet discontinuation; Happy New Year | गतवर्षी इंटरनेटबंदी; यंदा शुभेच्छांची गर्दी

गतवर्षी इंटरनेटबंदी; यंदा शुभेच्छांची गर्दी

Next

नाशिक : ११ आॅक्टोबर २०१६. विजयादशमीचा सण शहरात साजरा झाला होता तो तणावाच्या स्थितीत. तळेगाव अंजनेरी येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यामुळे विजयादशमीला व्हॉट््स अ‍ॅपवरून संदेशाची देवाणघेवाण होऊ शकली नव्हती. यावर्षी मात्र, आदल्या दिवसापासूनच विजयादशमीनिमित्त शुभेच्छा संदेशांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि व्हॉट््स अ‍ॅपवरच प्रतीकात्मक स्वरूपात सोने लुटण्याचा आनंद व्यक्त केला गेला.
मागील वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महामार्गावरील लांबपल्ल्याच्या बसेस, खासगी वाहने तसेच सरकारी वाहनांचीही तोडफोड केली होती़ या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले होते़ विजयादशमीच्या दिवशीही शहर व परिसरात तणावपूर्ण स्थिती होती. त्यामुळे विजयादशमीवर तणावाचे सावट होते. या तणावाखालीच नाशिककरांनी विजयादशमीचा सण साजरा केला होता. त्यावेळी शहरात पसरणाºया अफवा रोखण्यासाठी पोलिसांनी मोबाइल इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली होती. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवरून विजयादशमीच्या शुभेच्छा नेटिझन्सला देता आल्या नव्हत्या. विजयादशमीच्या दिवशी इंटरनेट बंद राहिल्याने नागरिकांनी शुभेच्छांचे लघुसंदेश पाठविणे पसंत केले होते. जवळपास सर्वच नेटवर्क सेवा पुरविणाºया कंपन्यांनी दसºयानिमित्त लघुसंदेशाचादेखील पूर्ण चार्ज आकारला होता. तणावाची स्थिती पाहून शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त असूनही त्यावेळी मुंबई महामार्गावर किरकोळ तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. वर्षभरापूर्वी तणावात विजयादशमी साजरा करणाºया नाशिककरांनी यंदाचा दसरा उत्साहात साजरा केला. व्हॉट््स अ‍ॅपवरून शुभेच्छा संदेश अक्षरश: ओसंडून वाहत होते.
राम, रावण आणि उपहासात्मक संदेश
विजयादशमीनिमित्त व्हॉट््स अ‍ॅपवर शुभेच्छा संदेशांचा पाऊस पडला शिवाय, राम आणि रावण यांच्या अंगभूत गुणांवरही प्रकाश टाकत सद्यस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला. दसºयानिमित्त महागाई, इंधनदरवाढीवर टिपणी करत सरकारवर तोंडसुख घेणाºया संदेशांनीही गर्दी केली होती. काही उपहासात्मक संदेश रंजन करणारे ठरले.

Web Title: Internet discontinuation; Happy New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.