बाधित ३०; कोरोनामुक्त ४८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 01:23 AM2022-02-24T01:23:25+5:302022-02-24T01:23:43+5:30
जिल्ह्यात बुधवारी (दि. २३) एकूण अवघे ३० रुग्ण नव्याने बाधित आढळून आले असून, ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एका नागरिकाचा बळी गेल्याने आतापर्यंतची बळींची संख्या ८८९० वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २३) एकूण अवघे ३० रुग्ण नव्याने बाधित आढळून आले असून, ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एका नागरिकाचा बळी गेल्याने आतापर्यंतची बळींची संख्या ८८९० वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थींची संख्या पाचशेच्या खाली अर्थात ४७५ पर्यंत कमी झाली आहे, तर जिल्ह्याचे कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९८.०३ टक्क्यांवर आणि कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर एक टक्क्यापेक्षाही कमी ०.८५ टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ९६८ अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. त्यात नाशिक ग्रामीणचे तब्बल ८८४, नाशिक मनपाचे ४६, तर मालेगाव मनपाचे ३८ अहवाल प्रलंबित आहेत.