बाधित ३३४; कोरोनामुक्त १००४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 01:18 AM2022-02-10T01:18:48+5:302022-02-10T01:19:08+5:30
जिल्ह्यात बुधवारी (दि.०९) एकूण ३३४ रुग्ण बाधित झाले असून १००४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ३ नागरिकांचा बळी गेला असून त्यात नाशिक ग्रामीणचे २ तर नाशिक मनपा हद्दीतील एका नागरिकाचा समावेश असून आतापर्यंतच्या बळींची संख्या ८८५६ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.०९) एकूण ३३४ रुग्ण बाधित झाले असून १००४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ३ नागरिकांचा बळी गेला असून त्यात नाशिक ग्रामीणचे २ तर नाशिक मनपा हद्दीतील एका नागरिकाचा समावेश असून आतापर्यंतच्या बळींची संख्या ८८५६ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात बाधितांमध्ये १७३ नाशिक मनपा, १२८ नाशिक ग्रामीण, ३ मालेगाव मनपा आणि २८ जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण प्रलंबित अहवालांची संख्या १६०४ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेच्या प्रमाणात अल्पशी वाढ होऊन ते प्रमाण ९७.४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थींच्या संख्येत मोठी घट आल्याने ती संख्या ३०५५ पर्यंत खाली आली आहे.