बाधित ४०; कोरोनामुक्त ५६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 01:39 AM2022-07-07T01:39:08+5:302022-07-07T01:39:29+5:30
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ६) एकूण ४० रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, विशेष म्हणजे तब्बल ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येत घट येऊन ती ३६६ वर आली आहे.
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. ६) एकूण ४० रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, विशेष म्हणजे तब्बल ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येत घट येऊन ती ३६६ वर आली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट २.१५ टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेचा दर ९८.०६ टक्के असला तरी प्रलंबित अहवालसंख्या ११०७ आहे. त्यात तब्बल ९८९ रुग्ण नाशिक ग्रामीणचे, ६५ नाशिक मनपाचे तर ५३ अहवाल मालेगाव मनपा क्षेत्रातील आहेत.