कुलगुरू पदासाठी ५ जुलैला राजभवन येथे मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:18+5:302021-06-28T04:11:18+5:30

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या प्रक्रियेअंतर्गत राजभवनातून ५ उमेदवारांना ...

Interviews for the post of Vice Chancellor on 5th July at Raj Bhavan | कुलगुरू पदासाठी ५ जुलैला राजभवन येथे मुलाखती

कुलगुरू पदासाठी ५ जुलैला राजभवन येथे मुलाखती

Next

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या प्रक्रियेअंतर्गत राजभवनातून ५ उमेदवारांना ५ जुलै २०२१ रोजी मुलाखतीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून या मुलाखतींनंतर तत्काळ कुलगुरूपदासाठी निवड झालेल्या उमेदवाराचे नाव घोषित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्यात आल्यानंतर देशभरातील तब्बल ३० उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यातून छाननी पात्र उमेदवारांच्या नावांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली होती. परंतु, पुन्हा या यादीत बदल करण्यात आल्यानंतर १९ व २० जून या कालावधीत झालेल्या मुलाखतींसाठी आमंत्रित करण्यात आले होते. निवड समितीने या मुलाखतींनंतर यातील ५ उमेदवारांची अंतिम फेरीसाठी निवड करीत ती राज्यपालांना सोपविली असून ५ जुलैला राजभवन येथे त्यांच्या मुलाखती होणार आहेत. यात सैन्यदलातील आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या डॉ. माधुरी कानिटकर यांच्यासह डॉ. अजय चंदनवाले, डॉ. नितीन गंगणे, डॉ. आरती किनीकर व डॉ. दीपक राऊत यांचा समावेश आहे. सध्या सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्याकडे आरोग्य विद्यापाठीचा प्रभारी कार्यभार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या मुलाखतीनंतर तत्काळ कुलगुरूपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Interviews for the post of Vice Chancellor on 5th July at Raj Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.