रॉयल ब्यूटीतून उलगडले महिलांचे अंतरंग
By admin | Published: June 15, 2014 01:06 AM2014-06-15T01:06:24+5:302014-06-15T01:28:39+5:30
रॉयल ब्यूटीतून उलगडले महिलांचे अंतरंग
नाशिक : स्त्री सौंदर्याबरोबरच तिच्या विविध भावना व्यक्त करणाऱ्या रॉयल ब्यूटी या चित्रप्रदर्शनास आज प्रारंभ झाला़
कुसुमाग्रज स्मारक येथे आज सायंकाळी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल व इंदू सरंगल यांच्या हस्ते फ ीत कापून व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले़ याप्रसंगी चित्रकार अॅड़ कामिया जाधव, अॅड़ जया इनामदार, क्रांती भोसले, डॉ़ रत्नाकर पवार, सागर खैरे आदि उपस्थित होते़
गुन्ह्याशी व कायद्याशी संबंधित व्यक्तीकडून अशा प्रकारची कलाकृती निर्माण होणे हे आश्चर्य असल्याचे मत कुलवंतकुमार सरंगल यांनी व्यक्त केले़ या चित्रांमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असून, समाजासाठी ही प्रेरणादाई बाब आहे, असे त्यांनी सांगितले़
अॅड़ कामिया जाधव यांनी ही कॅनव्हासवर आर्कलिक पेंटमधून ही चित्रे रेखाटली आहेत़ ३५ चित्रे या ठिकाणी ठेवण्यात आली असून, या चित्रांमधून स्त्री शक्तीची प्रतीके, स्त्री जीवनाचे विविध भाव रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे़ मुघलकालीन चित्रशैलीही यातून प्रगट होत आहे़ प्रदर्शन बुधवारपर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे़ (प्रतिनिधी)