उमराणे शाळेत डिजिटल सुर्यमालेची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 06:41 PM2019-07-25T18:41:59+5:302019-07-25T18:42:13+5:30
उमराणे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ििडजटल शैक्षणकि साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य होत आहे. शाळेत एल ई डी टीव्ही संच, टॅब, मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्र मातील नवनवीन संकल्पना स्पष्ट करून दिल्या.
उमराणे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ििडजटल शैक्षणकि साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य होत आहे. शाळेत एल ई डी टीव्ही संच, टॅब, मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्र मातील नवनवीन संकल्पना स्पष्ट करून दिल्या. अशाच एका उपक्र मंतर्गत या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांनी मर्ज क्युबच्या आधारे सुर्यमालेची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यार्थ्यांना ग्रह, उपग्रह या संकल्पना स्पष्ट करून सांगताना तरंगत्या सुर्यमालेची आभासी प्रतिमा दाखवून सूर्य, पृथ्वी, बुध, गुरू, शुक्र , शनी, मंगळ, फ्लूटो, नेपच्यून आदी ग्रह व त्यांचे उपग्रह त्यांचे आकार, रंग परिवलन, गती या सर्वांबाबत प्रत्यक्ष अनुभूतीतून माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. यातील थ्रीडी इफेक्टमुळे मुलांची जिज्ञासा, कुतूहल बघण्यासारखे होते.
या उपक्र मासाठी मुख्याध्यापिका मंगल देवरे, शिक्षक कल्पना निकम, स्वाती शेवाळे, जिजाबाई पवार, छाया कापडणीस, चंद्रकला भामरे, सुनंदा देवरे, प्रतिभा आहेर, सरला देवरे, योगेश देवरे, मंगल जगन्नाथ देवरे, रवींद्र बहिरम यांनी परिश्रम घेतले. @
---------------------------
डिजीटल सुर्यमालेची माहिती जाणून घेताना उमराणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी. (२५ उमराणे)