मनोरंजक पध्दतीने संख्यांची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:48 PM2020-03-18T13:48:04+5:302020-03-18T13:50:05+5:30
सटाणा: येथील जिल्हा परिषदेच्या शाळा मोरेनगर या शाळेत शाळेतील राष्ट्रपती आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांनी नाविन्यपूर्ण उपक्र म राबवून विद्यार्थ्यांना मनोरंजकपध्दतीने गणित शिकवून संख्यांची ओळख करून दिलीआहे.
आधार कार्डचा उपयोग करून विद्यार्थ्यांची गणित या विषयाशी त्यांनी मैत्री करून दिली आहे.गणित विषयाच्या अंक ज्ञान, संख्याज्ञान ,बारा अंका पर्यंत संख्या वाचन , संख्या लेखन ,संख्यांवरील क्रि या , विस्तारित रूप ,बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार ,संख्यांचा चढता उतरता क्र म आधी गणितीय अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने प्राप्त झाल्या आणि याच आधार कार्डने सोडवलं त्याचं व्यवहाराचं गणित असंच म्हणता येईल .
या उपक्र मातून विद्यार्थी मनोरंजक पद्धतीने गणित विषय शिकायला लागली आहेत.मुलांना संख्यांची ओळख सोप्या पद्धतीने होऊ लागली आहे., संख्या ज्ञान दृढीकरण होऊन आधार कार्ड यासंकल्पनेविषयी माहिती झाली आहे . संख्यांमधील चढता उतरता क्र म सोप्या पद्धतीने समजून , विद्यार्थ्यांना बारा अंकी (एकक ते दश अब्ज पर्यंत) संख्या मनोरंजक पद्धतीने वाचता लिहता येऊ लागल्या आहेत. स्वत:चे तसेच वर्गातील सर्व मित्रांचे आधार क्र मांक ,आधार संख्या माहिती झाली आहे विद्यार्थ्यांना आधार कार्ड द्वारे होणारे विविध व्यवहार माहिती झाले आहेत.
-गणित विषयाच्या अध्ययन क्षमता सोप्या व मनोरंजक पद्धतीने विद्यार्थांना अवगत होण्यासाठी आधार कार्ड वरील कल्पक व नाविन्यपूर्ण अफलातून उपक्र म मोरेनगर शाळेतील सोपान खैरनार यांनी यशस्वीपणे राबवून नक्कीच संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना अनुकरणीय उपक्र म केला आहे .
-मीना मोरे, जिल्हापरिषद सदस्य.