भारताच्या लष्करी तळावर पाकिस्तानातून घुसखोरी
By admin | Published: September 21, 2016 12:08 AM2016-09-21T00:08:24+5:302016-09-21T00:08:37+5:30
मनमाड परिसरात संताप
मनमाड : काश्मीरमधील उरी येथील भारताच्या लष्करी तळावर पाकिस्तानातून घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्यात देशाचे जवान शहीद झाले. या घटनेबद्दल शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने अतिरेकी हल्याचा व पाकिस्तानच्या घुसखोरीचा निषेध करण्यासाठी स्व. राजाभाउ छाजेड चौकात पुतळा दहन करण्यात आले. पाकिस्तानच्या विरोधात या वेळी घोषणाबाजी करण्यात आली.या घटनेचे जशास तसे उत्तर देण्यात यावे अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे शहर अध्यक्ष मयूर बोरसे, राजाभाउ भाबड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
सिमेवरील अतिरेकी हल्लयाचा शहरतील मुस्लीम बांधवांनी निषेध व्यक्त करून पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. येथील एकात्मता चौकात मुस्लीम बांधवांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली. या घटनेचा निषेध करून भारत सरकारने या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. सिमेवरील दहशतवादास प्रत्यूत्तर देण्यासाठी सर्व बाजुंनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. शहरातील विविध मशिदी, मुस्लीम संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी जामा माशीदीचे मौलाना असलम रिझवी, हाजी उस्मान साहब,हाजी अन्वर सर, जहीर सेठ, जुबेर शेख, नगरसेवक बब्बु कुरेशी, सादिक पठाण,राजाभाउ पगारे, हबीब शेख फुले शाहू मुस्लीम विचार मंचचे फिरोज शेख, अहमद बेग मिर्झा, विलास अहिरे आदी उपस्थित होते.