हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 11:02 AM2020-11-24T11:02:30+5:302020-11-24T11:02:42+5:30
सलग पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दमछाक झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील कविता मधे या सहा वर्षीय बालिकेवर केलेल्या हल्ल्यातील हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अखेर यश आले आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून वनकर्मचारी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कसोशीने रात्रंदिवस प्रयत्न करत होते. पाच दिवस झाले परंतु पाच दिवसांत हा नरभक्षक बिबट्या या ठिकाणी तैनात केलेल्या चार पिंजऱ्या कडे साधा फिरकला देखील नाही. सलग पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दमछाक झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
इगतपुरी प्रादेशिक विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनरक्षक श्रीमती आर.टी. पाठक यांच्या नेतृत्वाखाली भंडारदरावाडी टाकेद वनपरिमंडळ अधिकारी ई.टी.भले, अडसरेचे वनरक्षक एस.के. बोडके, वनरक्षक भंडारदरावाडी एफ.जे.सय्यद, वनरक्षक धामणी वनरक्षक एम.जे.पाडवी, वनरक्षक बी.एस खाडे, वनमजुर डी.आर. निरगुडे, जी.बी बेंडकोळी, ए.आर.मदगे, आदींची टिम या हल्लेखोर बिबट्यावर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून लक्ष ठेऊन होती. अखेर आज या हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंपळगाव येथे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.