अवैध हुक्का पार्लर उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:59 AM2019-12-20T00:59:47+5:302019-12-20T01:00:33+5:30
हुक्क्याच्या नशेत तरुणाई बेभान होऊन आपले आयुष्य बरबाद करताना दिसून येत आहे. शहरातील मुंबईनाका परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला अवैध ‘पुट्टास ब्लू-फॉग’ नावाचे हुक्का पार्लरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. पार्लर चालविणाऱ्यांसह येथे हुक्क्याचा धूर करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक : हुक्क्याच्या नशेत तरुणाई बेभान होऊन आपले आयुष्य बरबाद करताना दिसून येत आहे. शहरातील मुंबईनाका परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला अवैध ‘पुट्टास ब्लू-फॉग’ नावाचे हुक्का पार्लरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. पार्लर चालविणाऱ्यांसह येथे हुक्क्याचा धूर करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.१८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे मुंबईनाका येथील एका व्यापारी संकुलात सुरू असलेला ‘ब्लू फॉग’या पार्लरवर धाड टाकली. हे पार्लर मुंबईनाका पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू होते. त्याची गोपनीय माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेस मिळाली. पार्लरमालकासह आठ संशयितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करत सुमारे १ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हुक्का पार्लर चालविणाºया अभिषेक सुब्रह्मण्यम मंजीजीयाविरुद्ध (३५, रा.भाभानगर) मुंबईनाका पोलीस ठाण्यात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.