उंदीर घोटाळ्याच्या चौकशीसाठी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:23 AM2018-03-27T00:23:12+5:302018-03-27T00:23:12+5:30

मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट घोटाळ्याची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

To investigate the riot scam | उंदीर घोटाळ्याच्या चौकशीसाठी धरणे

उंदीर घोटाळ्याच्या चौकशीसाठी धरणे

googlenewsNext

नाशिक : मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट घोटाळ्याची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.विधिमंड ळाच्या अधिवेशनात भाजपाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून यातील घोटाळा उघडकीस आणला होता. त्या अनुषंगाने प्रहार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मंत्रालयात उंदीर दाखवा एक लाख रुपये मिळवा’ असा फलक लावून धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाराष्टÑ सरकार व घोटाळेबाज अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्याच्या मंत्रालयात अशा प्रकारचे घोटाळे करून जनतेच्या करातून आलेल्या पैशांची भ्रष्टमार्गाने लूट केली जात आहे. मुख्यमंत्री या घटनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.  या आंदोलनात अनिल भडांगे, महेश आव्हाड, दत्तू बोडके, प्रकाश चव्हाण, सचिन पानमंद, बबलू मिर्झा, जगन काकडे, श्याम गोसावी, शरद शिंदे, उमेश शिंदे, किरण गोसावी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकशीची मागणी
मंत्रालयातच भ्रष्टाचार होत असेल तर महाराष्टÑातील प्रत्येक गावात, शहरात किती भ्रष्टाचार व घोटाळे होत असतील. त्यामुळे अगोदर मंत्रालयाचे सहा मजले भ्रष्टाचारमुक्त केल्यास महाराष्टÑ भ्रष्टाचारमुक्त होईल. भ्रष्ट अधिकाºयांवर कारवाई करावी अथवा जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: To investigate the riot scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.