बेपत्ता मुलीचा दोन तासांत तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:52 AM2019-06-22T00:52:47+5:302019-06-22T00:53:10+5:30
परिसरातून हरविलेल्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांनी सतर्कता दाखवून निर्भया पथकाच्या मदतीने अवघ्या दोन तासांत ताटातूट झालेल्या मुलीची आणि आई-वडिलांची भेट घडविल्याने मांगीलाल चौधरी यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा ‘खुशी’ परतल्याने कुटुंबाचा आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
सिडको : परिसरातून हरविलेल्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांनी सतर्कता दाखवून निर्भया पथकाच्या मदतीने अवघ्या दोन तासांत ताटातूट झालेल्या मुलीची आणि आई-वडिलांची भेट घडविल्याने मांगीलाल चौधरी यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा ‘खुशी’ परतल्याने कुटुंबाचा आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
त्रिमूर्ती चौकात शुक्रवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास मांगिलाल चौधरी यांची दोन वर्षांची मुलगी खुशी परिसरात फिरताना पोलिसांना आढळून आली. मात्र तिला स्वत:चे अथवा आपल्या आई-वडिलांचे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ निर्भया पथकाच्या मदतीने आई-वडिलांचा शोध सुरू करून दोन तासांच्या आत खुशीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे ताटतूट झालेल्या खुशीची तिच्या आई-वडिलांशी पुन्हा
त्रिमूर्ती चौकातील पोलीस चौकीजवळ दोन वर्षांची मुलगी एकटीच फिरताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला काहीही सांगता येत नव्हते. त्यामुळे मुलीचे नाव तसेच तिच्या आई-वडिलांचे नाव व त्यांचा राहण्याचा पत्ता शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिल्याने त्यांनी निर्भया पथक तीनला मदतीसाठी पाचारण केले.
भेट झाल्याने चौधरी कुटुंबीयांचा आनंद ओसंडून वाहताना दिसून आला. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगीता जाधव, पोलीस नाईक खैरनार, पोलीस शिपाई दीपक चव्हाण, विकास पाटील व त्रिमूर्ती चौकीतील हवालदार चव्हाण, पोलीस नाईक राऊत, सामाजिक कार्यकर्ते राकेश ढोमसे यांनी परिसरात दोन तास शोध मोहीम राबवून दोन वर्षांच्या खुशीचे वडील मांगीलाल चौधरी यांचा शोध लावला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुशी दोन तासांत परत मिळाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.