गांजातस्कर लक्ष्मीच्या मालमत्तेचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:38 AM2018-07-09T00:38:40+5:302018-07-09T00:39:19+5:30

नाशिक : ओडिशातून नाशिकमध्ये आणलेल्या लाखो रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणात मध्य प्रदेशातून अटक केलेली प्रमुख संशयित तथा सेनेची माजी कार्यकर्ती लक्ष्मी ताठे हिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे़ विशेष म्हणजे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना तिने जमविलेल्या ‘माया’बाबत पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे़

 Investigating property of Gaanjaskar Lakshmi | गांजातस्कर लक्ष्मीच्या मालमत्तेचा शोध सुरू

गांजातस्कर लक्ष्मीच्या मालमत्तेचा शोध सुरू

Next

नाशिक : ओडिशातून नाशिकमध्ये आणलेल्या लाखो रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणात मध्य प्रदेशातून अटक केलेली प्रमुख संशयित तथा सेनेची माजी कार्यकर्ती लक्ष्मी ताठे हिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे़ विशेष म्हणजे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना तिने जमविलेल्या ‘माया’बाबत पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे़
पंचवटीतील तपोवन तसेच सिन्नर येथून शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने एक टनाहून अधिक गांजा पकडला होता़ यामध्ये अटक केलेल्या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर नाशिकमधील एका महिलेने आपल्या साथीदाराच्या साहाय्याने ओडिशा येथून हा गांजा मागविल्याचे समोर आले़ तसेच केवळ नाशिक शहरच नव्हे तर जिल्हा व राज्यभरात गांजा तस्करी करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले़ या प्रकरणानंतर प्रमुख सूत्रधार लक्ष्मी ताठे ही फरार झाली होती़ मध्य प्रदेशातील सेंधवा येथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. लक्ष्मीची कसून चौकशी केली जात असून, गांजा तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे़ त्यातच उत्पन्नाचे साधन नसताना लक्ष्मी ताठे हिचा आलिशान बंगला, महागड्या गाड्या अशी मालमत्ता समोर आली आहे़ दरम्यान, या प्रकरणातील तिचे दोन साथीदार फरार असून, त्यांचाही शोध सुरू आहे़

Web Title:  Investigating property of Gaanjaskar Lakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.