सात महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:55 AM2018-08-05T00:55:17+5:302018-08-05T00:55:30+5:30

सिन्नर : सुमारे सात महिन्यांपूर्वी येथील झापवाडी रस्त्यालगत इंद्रप्रस्थ अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीचा तपास लावण्यात सिन्नर पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर परिसरात झालेल्या घरफोडीतील संशयिताना सहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.

Investigation of the burglary seven months ago | सात महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा तपास

सात महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा तपास

Next
ठळक मुद्देसिन्नर : सहा तोळे सोन्याच्या मुद्देमालासह दोघेजण ताब्यात

सिन्नर : सुमारे सात महिन्यांपूर्वी येथील झापवाडी रस्त्यालगत इंद्रप्रस्थ अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीचा तपास लावण्यात
सिन्नर पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर परिसरात झालेल्या घरफोडीतील संशयिताना सहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.
वडांगळी शाळेतील शिक्षक काकासाहेब राजाराम तांबे हे झापवाडी शिवारातील इंद्रप्रस्थ अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहातात. घराला कुलूप असताना भरदिवसा अज्ञात चोरट्याचे कुलूप तोडून घरातील सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. यावेळी चोरटा दुसºया मजल्यावर राहणाºया राजेंद्र जगझाप यांच्या सीसीटीव्ही कॅमेºयात जेरबंद झाला होता.
पोलीस सात महिन्यांपासून या चोरट्याचा तपास करीत होते. मात्र पोलिसांना तो मिळून येत नव्हता. दरम्यान, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, कर्मचारी भगवान शिंदे, विनोद टिळे, राहुल निरगुडे हे शिवाजीनगर सिन्नर परिसरात गस्त करत असताना त्यांना एक मुलगा संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. त्याला हटकून त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यास पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याला पोलीस खाक्या दाखवून विचारपूस केल्यानंतर त्याने त्याचे नाव आकाश ऊर्फ विकास बाळासाहेब पोपळघट, रा. कानडी मळा, सिन्नर असे सांगितले.
त्याने शिवाजीनगर भागातील राहणारे काकासाहेब राजाराम तांबे यांचे राहते घरातून सोन्याचे दागिने चोरल्याबाबत कबुली दिली. नागरिकांमध्ये समाधान सदर गुन्ह्यात सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी गेले होते. तपासात चोरीसाठी आरोपीची आईदेखील सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितांकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. उपनगरात झालेल्या चोरीचा तपास लावण्यात सिन्नर पोलिसांना यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Investigation of the burglary seven months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा