नाशिक सायबर पोलीसांचा तपास : अश्लील छायाचित्रांना वापरले महिलेचे छायाचित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:53 PM2018-02-10T14:53:40+5:302018-02-10T14:55:45+5:30
महिला कर्मचा-याचा चेहरा अश्लील छायाचित्रांना वापरून ती छायाचित्रे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संशयिताने व्हायरल केले.
नाशिक : सोशल मिडियावर छायाचित्रे अपलोड करताना महिलांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. स्वत:ची छायाचित्रे चांगल्या रिझुलेशनची जर असेल तर त्या छायाचित्रांचा गैरवापरही होऊ शकतो, असाच एक धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने एका कर्मचारी महिलेच्या छायाचित्रांचा आधार घेत त्या महिलेचा चेहरा अश्लील छायाचित्रांना वापरल्याचे समोर आले आहे.
याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका कार्यालयात नोकरी करणाºया महिलेचे छायाचित्रे सोशल मिडियाच्या माध्यमातून मिळवून संशयिताने त्या छायाचित्रांचा वापर अश्लील छायाचित्रांसाठी केला. महिला कर्मचा-याचा चेहरा अश्लील छायाचित्रांना वापरून ती छायाचित्रे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संशयिताने व्हायरल केले. तसेच कार्यालयातील अन्य महिलांच्या भ्रमणध्वनीवरदेखील व्हॉट्सअॅपद्वारे अश्लील छायाचित्रे पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताने तब्बल आठ भ्रमणध्वनी क्रमांकाचा वापर यासाठी केला आणि या वेगवेगळ्या भ्रमणध्वनी क्रमांकावरुन पिडित महिलेला शिवीगाळ केली.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयिताविरुध्द गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. तसेच संशयिताने वापरलेल्या सर्व भ्रमणध्वनी क्र मांकाची माहिती तपासली जात असून पोलीस निरिक्षक राजेंद्र कुटे हे पुढील तपास करत आहेत.
सोशल मिडियाचा सतर्कतेने करावा वापर
एकूणच सोशल मिडिया हाताळताना महिला, युवतींनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा, छायाचित्रांची देवाणघेवाणीसह वैयक्तिक माहितीचे आदानप्रदान टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. तसेच व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग्समध्ये सुरक्षेसंदर्भाात असलेलल्या बाबी सक्रिय कराव्या. तसेच चांगल्या दर्जाची छायाचित्रे अपलोड करणे टाळावे.