ड्रग्ज प्रकरणात माजी महापौर विनायक पांडे यांची चौकशी; आज दुपारी क्राईम ब्रँचमध्ये हजेरी लावणार
By संजय पाठक | Published: October 27, 2023 02:29 PM2023-10-27T14:29:56+5:302023-10-27T14:30:45+5:30
आपण दुपारी क्राईम ब्रॅंचमध्ये जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.
नाशिक - ड्रग्ज माफीया ललीत पाटील प्रकरणी नाशिक पोलीसांनी ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांना नोटीस बजावली असून आज दुपारी ते क्राईम ब्रँचमध्ये जाणार आहेत. विनायक पांडे यांना आज दुपारी १२ वाजून २१ मिनीटांनी पोलीसांनी नोटीस बजावली असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार आपण दुपारी क्राईम ब्रॅंचमध्ये जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.
ललीत पाटील हा शिवसेनेत २०१६ मध्ये दाखल झाला होता. त्याचा विनायक पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त तुला झाली हेाती. त्यावेळी तो हजर असल्याचा फाेटो व्हायरल झाला हाेता. गुरूवारी (दि.२६) विनायक पांडे यांनी पत्रकार परीषद घेऊन आपल्यावर हेात असलेल्या आरोपांचा इन्कार केला होता. तसेच आपला २०१६ नंतर ललीत पाटील याच्याशी कधीही संबंध आला नाही. २०१८ मध्ये त्याने आपल्या नातेवाईकांचा व्यवसाय बळकवल्याने फाेन केला होता. त्यावेळी फोनवरच वाद झाले होते त्यानंतर पुन्हा आपला कधीच संंबंध आला नाही असे पत्रकार परीषदेत सांगून आपण पेालीस चौकशीला कधीही तयार असल्याचे सांगितले होते.