सराफी व्यावसायिकांची दुसºया दिवशीही चौकशी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:51 AM2018-02-23T00:51:19+5:302018-02-23T00:55:55+5:30

नाशिक : पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणाºया संशयित नीरव मोदी व चोकसी यांच्या ‘गीतांजली’सह इतर ब्रँडची सराफांनी फ्रेंचायसी घेतली असून, त्या सर्वांची आयटी व ईडीच्या पथकाने चौकशी सुुरू केली आहे़ शहरातील कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स, समर्थ नगर येथील द-दमाज व गंगापूर नाक्यावरील आदित्य ज्वेलर्स या तीन सराफी पेढ्यांनी ‘गीतांजली’ ब्रँडची फ्रेंचायसी घेतली असल्याने त्यांनी विक्री केलेले दागिने व आर्थिक व्यवहाराची ईडी व आयटीकडून बुधवार (दि़२१) पासून चौकशी सुरू आहे़ आयटी व ईडीच्या अधिकाºयांकडून गुरुवारी (दि़२२) देखील या तीन सराफी दुकानांची चौकशी सुरू होती़ दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील इतर सराफी व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहे़

Investigation on the second day of Sarai Vahanvas continues | सराफी व्यावसायिकांची दुसºया दिवशीही चौकशी सुरूच

सराफी व्यावसायिकांची दुसºया दिवशीही चौकशी सुरूच

Next
ठळक मुद्देछापे हे ईडीने टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली द-दमाज व आदित्य ज्वेलर्स यांची मध्यरात्रीच्या सुमारास चौकशी पूर्ण

नाशिक : पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणाºया संशयित नीरव मोदी व चोकसी यांच्या ‘गीतांजली’सह इतर ब्रँडची सराफांनी फ्रेंचायसी घेतली असून, त्या सर्वांची आयटी व ईडीच्या पथकाने चौकशी सुुरू केली आहे़ शहरातील कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स, समर्थ नगर येथील द-दमाज व गंगापूर नाक्यावरील आदित्य ज्वेलर्स या तीन सराफी पेढ्यांनी ‘गीतांजली’ ब्रँडची फ्रेंचायसी घेतली असल्याने त्यांनी विक्री केलेले दागिने व आर्थिक व्यवहाराची ईडी व आयटीकडून बुधवार (दि़२१) पासून चौकशी सुरू आहे़ आयटी व ईडीच्या अधिकाºयांकडून गुरुवारी (दि़२२) देखील या तीन सराफी दुकानांची चौकशी सुरू होती़ दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील इतर सराफी व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहे़
आयटी व ईडीच्या पथकाने बुधवारी सुराणा ज्वेलर्स, आदित्य ज्वेलर्स व द-दमाज या सराफी पेढ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली़ या चौकशीसाठी मुंबईहून दोन-तीन इनोव्हा वाहनातून हे अधिकारी नाशिकमध्ये आले आहेत़ दरम्यान, कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स हे सराफी दुकान पूर्ववत सुरू होते तर त्यापाठीमागील दुसºया सुराणा ज्वेलर्स या दुकानाचे शटर अर्धवट उघडे ठेवून अधिकाºयांची चौकशी सुरू होती़ ईडी व आयटीचे अधिकारी या सराफी व्यावसायिकांनी फ्रेंचायसीच्या कालावधीत केलेली दागिन्यांची विक्री, त्यांचे मोदीच्या कंपनीसोबत झालेले आर्थिक व्यवहार याबाबत माहिती घेत होते़
सदरचे छापे हे ईडीने टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान, द-दमाज व आदित्य ज्वेलर्स यांची मध्यरात्रीच्या सुमारास चौकशी पूर्ण झाली, तर कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्सची गुरुवारी सायंकाळपर्यंत चौकशी सुरू होती़

Web Title: Investigation on the second day of Sarai Vahanvas continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं