जेऊरच्या खूनप्रकरणी तपास पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:31 PM2020-08-08T23:31:25+5:302020-08-09T00:09:55+5:30

मालेगाव : नांदगाव व मालेगाव तालुक्याला हादरून सोडणाऱ्या जेऊर येथील खूनप्रकरणी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाने चार पथके तयार केली असून, तपास पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.

Investigation teams dispatched to Jeur's murder case | जेऊरच्या खूनप्रकरणी तपास पथके रवाना

जेऊरच्या खूनप्रकरणी तपास पथके रवाना

Next
ठळक मुद्देशनिवारी सायंकाळपर्यंत संशयिंत आरोपींचा शोध लागला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : नांदगाव व मालेगाव तालुक्याला हादरून सोडणाऱ्या जेऊर येथील खूनप्रकरणी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाने चार पथके तयार केली असून, तपास पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत संशयिंत आरोपींचा शोध लागला नव्हता.
मालेगाव तालुक्यातील वाखारी शिवारात रिक्षाचालक समाधान चव्हाण, पत्नी भारती चव्हाण, मुलगा अनिरुद्ध, मुलगी आरोही यांचा अज्ञात हल्लेखोरांनी निघृणपणे खून केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह, अपर पोलीस संदीप घुगे यांनी पाहणी करुन पंचनामा केला. याप्रकरणी पोलीसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. तालुका पोलीस ठाणे, नांदगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे असे एकूण चार पथके संशयीत आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे संशयीतांचा शोध घेतला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Web Title: Investigation teams dispatched to Jeur's murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.