कोरोना रु ग्ण आढळल्याच्या पाशर््वभूमीवर होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:08 PM2020-06-27T17:08:13+5:302020-06-27T17:08:56+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात शहरांसह ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून वारंवार काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील साकूरफाटा येथे एक २४ वर्षीय महिला आढळून आली होती.

An investigation will be carried out on the background of corona disease | कोरोना रु ग्ण आढळल्याच्या पाशर््वभूमीवर होणार तपासणी

साकूर येथे संपूर्ण गावात प्राथमिक आरोग्य तपासणी करतांना अंगणवाडी सेविका मंगल सहाणे, आशासेविका रंजना साळवे, मदतनीस हौसाबाई घाडगे व इतर.

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाची नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात शहरांसह ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून वारंवार काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील साकूरफाटा येथे एक २४ वर्षीय महिला आढळून आली होती. तिच्या संपर्कात असलेल्या १३ जणांपैकी एका व्यक्तीचा अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आल्याने साकूर गावामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्याच पाशर््वभूमीवर सरपंच विनोद आवारी यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांची तातडीने बैठक घेऊन संपूर्ण गावाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याप्रसंगी अंगणवाडी सेविका, आशासेविका, व मदतनीस यांना तपासणी साहित्याचे वाटप करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील साकुरफाटा येथे कोरोना पॉझििटव्ह रु ग्ण आढळून आल्याने साकूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व आरोग्य विभागाला खडबडून जाग आली असून साकूर गाव १४ दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. यापुढे नागरिकांची काळजी घेण्याच्या उद्देशाने सरपंच विनोद आवारी यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका व आशासेविका यांची तीन गटांमध्ये विभागणी करु न संपूर्ण गावाची तपासणी करण्याची जबाबदारी देण्यात आली असून त्यांना सरपंच आवारी यांच्या हस्ते तपासणी मीटर, आॅक्सीजन लेव्हल तपासणी मीटर, हातमोजे, सॅनिटायझर आदीं तपासणी साहित्याचे वाटप करण्यात आले असून प्रत्यक्षात तपासणी कामाला सुरु वात करण्यात आली आहे.
यासाठी सरपंच विनोद आवारी, ग्राम अधिकारी जितेंद्र चाचरे, उपसरपंच दिनकर सहाणे, पोलीस पाटील शिवाजी सहाणे, आशासेविका सरला सहाणे, रंजना साळवे, कमल साळवे व आरोग्य कर्मचारी ठाकुर अंगणवाडी सेविका, मंगल सहाणे, आशा सहाणे, रेखा सहाणे, मदतनीस हौसाबाई घाडगे, जिजाबाई सहाणे, वंदना गाडेकर, शैला रायकर, ग्रामपंचायत कर्मचारी तुकाराम रायकर, रतन सहाणे, रामदास उगले, लक्ष्मण गोधडे आदींनी मेहनत घेतली आहे.
 

Web Title: An investigation will be carried out on the background of corona disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.